नवी दिल्ली, 23 जून : तुम्हाला इंडियन एअरफोर्स (Indian Air Force) जॉईन करायचं असेल तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. इंडियन एअरफोर्सने तब्बल 357 पदांसाठी भरती सुरू केली आहे. या पदांसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज (online application) करावा लागेल. अधिकृत जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार, 357 जागा भरल्या जाणार असून अर्ज करण्याची शेवटची (last day of application) तारीख 30 जून 2021 आहे. इच्छूक उमेदवार एअरफोर्सच्या afcat.cdac.in या अधिकृत वेबसाइटवर (Official Website of Air Force) जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. इंडियन एअरफोर्सने या व्हॅकन्सीच्या जाहिरातीत परीक्षेच्या (Airforce AFCAT Recruitment 2021) तारखांची घोषणा अद्याप केलेली नाही. या आहेत जागा एएफसीएटी (Air Force Common Admission Test ) - 96 पदं ग्राउंड ड्यूटी (टेक्निकल) Ground duty (Technical ) - 107 पदं, ग्राउंड ड्यूटी (नॉन टेक्निकल) Ground duty (Non Technical ) - 96 पदं मेट्रोलॉजी (Metrology) - 28 पदं आणि इतर काही पदांसाठी एनसीसी स्पेशल एंट्री (NCC Special Entry ) देण्यात येईल. हे वाचा - Engineers साठी सुवर्णसंधी! CDAC मुंबई इथे तब्बल 51 जागांसाठी पदभरती शैक्षणिक पात्रता फ्लाइंग ब्रांचमध्ये (flying branch) अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून गणित आणि भौतिकशास्त्रात पदवी (Degree in Mathematics and Physics ) घेतलेली असणं आवश्यक आहे. तर, ग्राउंड ड्यूटी (ground duty) पदासाठी 12 वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. कोणत्याही स्ट्रीममधील लॉजिस्टिक्स पदवीधर विद्यार्थी ग्राउंड ड्युटी नॉनटेक्निकलसाठी (Ground duty non technical) अर्ज करू शकतात. तर काही अकाउंट सेक्शनमध्ये (account section) कॉमर्स विषयातील पदवीधर (commerce graduate students) विद्यार्थी अर्ज करू शकतात. एनसीसी स्पेशल एन्ट्रीमध्ये एनसीसी एअर विंगचे सिनिअर डिव्हीजन ‘सी’ प्रमाणपत्र (Senior Division ‘C’ Certificate of NCC Air Wing) असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अशा पद्धतीनं करा अर्ज इच्छुक आणि उमेदवार अधिकृत वेबसाइट afcat.cdac.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी तुम्हाला लॉग इन करून अर्ज भरावा लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.