जाहिरात
मराठी बातम्या / मनी / या आहेत LIC आणि Post Officeच्या बेस्ट पॉलिसी, वाचा या योजनेतून कसे मिळतील 14.29 लाख

या आहेत LIC आणि Post Officeच्या बेस्ट पॉलिसी, वाचा या योजनेतून कसे मिळतील 14.29 लाख

काही गोष्टी नव्याने सुरु करा. दोघांपैकी एकाने नोकरी गमावली तर, घराच्या बजेटमध्ये नक्कीच अडचण येऊ शकते. आपल्या येणाऱ्या पगाराप्रमाणे आपण आपले खर्च ठरवत असतो. घराचे हप्ते, काही प्लॅनिंग खराब होतात पण, या नकारात्मक परिस्थितीतही शांत राहा.

काही गोष्टी नव्याने सुरु करा. दोघांपैकी एकाने नोकरी गमावली तर, घराच्या बजेटमध्ये नक्कीच अडचण येऊ शकते. आपल्या येणाऱ्या पगाराप्रमाणे आपण आपले खर्च ठरवत असतो. घराचे हप्ते, काही प्लॅनिंग खराब होतात पण, या नकारात्मक परिस्थितीतही शांत राहा.

पोस्ट ऑफिस (Post Office) आणि एलआयसीच्या (LIC) काही योजना सर्वोत्तम असून, गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय आहे. या योजनेत गुंतवणूक करून आपण कमी कालावधीत चांगला नफा मिळवू शकता.

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 22 मे: भविष्याची तरतूद म्हणून प्रत्येकजण आपल्या कमाईतील काही हिस्सा विविध योजनांमध्ये गुंतवत असतो. या योजनांद्वारे चांगला परतावा मिळावा तसंच त्यातील जोखीम कमी असावी अशी गुंतवणूकदारांची इच्छा असते. याकरता पोस्ट (Post Office) आणि एलआयसीच्या (LIC) योजनांना प्राधान्य दिलं जातं. पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या काही योजना सर्वोत्तम असून, गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय आहे. या योजनेत गुंतवणूक करून आपण कमी कालावधीत चांगला नफा मिळवू शकता. पोस्ट खात्यातर्फे 9 विविध बचत योजना उपलब्ध असून, ज्यांचा व्याजदर सध्या वार्षिक 7.6 टक्क्यांपर्यंत आहे. त्याचबरोबर एलआयसीच्या विविध बचत योजना उत्तम परतावा देतात. पोस्टात बचत खाते, मुदत ठेव, पीपीएफ, केव्हीपी, एनएससी, एमआयएस आणि सुकन्या समृध्दी (SCSS, PPF, KVP, NSC, MIS, SSY) तसंच ज्येष्ठ नागरिक बचत योजना अर्थात एससीएसएस आदी योजना आहेत. हे वाचा- भारतीयांपेक्षा श्रीमंत झाले बांगलादेशी, 1.67 लाख रुपयांवर पोहोचलं दरडोई उत्पन्न ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS): या योजनेचा मॅच्युरिटीचा कालावधी 5 वर्षे असून, यावर सध्या वार्षिक 7.4 टक्के व्याजदर आहे. यात एकदाच गुंतवणूक करता येते. किमान 1000 रुपयांपासून ते जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्तीही हे खाते उघडू शकते. या योजनेत दहा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 5 वर्षानंतर वार्षिक 7.4 टक्के व्याजदरानं 14 लाख 28 हजार 964 रुपये मिळतील. मासिक उत्पन्न योजना (MIS): या गुंतवणूक योजनेद्वारे तुम्ही दरमहा उत्पन्नाची सोय करू शकता. या योजनेत वार्षिक 6.6 टक्के व्याज मिळते. किमान 1000 रुपयांसह एमआयएसमध्ये खाते उघडता येते. ही अतिशय सुरक्षित योजना असून, परतावाही चांगला मिळतो. 5 वर्षाचे रिकरिंग डिपॉझिट (RD) : दरमहा किमान 100 रुपये भरून पोस्टात रिकरिंग डिपॉझिट खातं उघडता येतं. याचा कालावधी 5 वर्षे असतो. या योजनेत सध्या वार्षिक 5.8 टक्के दरानं व्याज मिळतं. हे खातं एकाच्या नावानं किंवा संयुक्त नावानंही उघडता येतं. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आणि मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या व्यक्तीच्या नावेही खातं उघडता येतं. हे खातं महिन्याच्या 15 तारखेपूर्वी उघडले असेल तर दरमहा 15 तारखेपूर्वी त्यात पैसे भरणे आवश्यक आहे. हे वाचा- विमा कव्हर घेताय? या तीन पद्धतींनुसार ठरवा विम्याची योग्य रक्कम किती असावी पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट (TD): पोस्ट ऑफिसमध्ये 1 वर्षापासून ते 5 वर्षांपर्यंत टाईम डिपॉझिट खातं उघडता येते. किमान 1000 रुपयांमध्ये हे खातं उघडता येतं कमाल रकमेसाठी यात कोणतीही मर्यादा नाही. सध्या या योजनेचा व्याज दर वार्षिक 5.5 टक्के ते 6.7 टक्क्यांपर्यंत आहे. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एलआयसीच्या (LIC) योजनाही गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहेत. एलआयसी विविध प्रकारचे विमा (Insurance) आणि गुंतवणूकीचे (Investment) पर्याय देते. नवीन विमा बचत योजना (New Bima Savings Scheme) : ही एक मनी बॅक योजना (Money Back Policy) आहे. यामध्ये, मुदतपूर्तीनंतर लॉयल्टीसह एक रकमी प्रीमियम परत केला जातो. यात कर्जाची सुविधाही आहे. 9, 12 आणि 15 वर्षांचे मुदत पर्याय उपलब्ध आहेत. योजनेत मुदतीच्या पहिल्या पाच वर्षात विमा धारकाचा मृत्यू झाल्यास फक्त प्रीमियमची रक्कम परत केली जाते. पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर मृत्यू झाल्यास काही लॉयल्टी जमा असल्यास त्यासह प्रीमियम दिला जातो. न्यू बीमा बचत योजनेतील गुंतवणूकदारांसाठी किमान वयोमर्यादा 15 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 50 वर्षे आहे. हे वाचा- या योजनेत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला मिळतील 4950 रुपये, जाणून घ्या स्किमबाबत नवीन जीवन शांती डिफर्ड अॅन्युइटी योजना (New Jeevan Shanti Differed Annuity Scheme): एलआयसीने सेवानिवृत्तीनंतरच्या पेन्शन (Pension) सुविधेसाठी ही योजना आणली आहे. ही एक नॉन-लिंक्ड, डिफर्ड अॅन्युइटी योजना आहे. या नवीन योजनेत पॉलिसीसाठी वार्षिक दराची हमी पॉलिसीच्या सुरूवातीसच दिली जाते, असं एलआयसीनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. संयुक्त योजनेसाठी यात किमान दीड लाख रुपये गुंतवावे लागतील. जे तुमच्या सोयीनुसार वार्षिक, अर्धवार्षिक, तिमाही किंवा मासिक तत्वावर देऊ शकता. या योजनेतील किमान वार्षिक पेन्शन 12 हजार रुपये आहे. न्यू चिल्ड्न्स मनी बॅक योजना (New Children’s Money Back Policy): एलआयसीनं मुलांच्या गरजा लक्षात घेऊन ही नवीन योजना दाखल केली आहे. याचा लाभ घेण्यासाठी किमान वय शून्य वर्षे तर कमाल वय 12 वर्षे आहे. याची किमान विमा रक्कम 10 हजार रुपये आहे. प्रीमियम वेव्हर बेनिफिट राइडर पर्यायदेखील उपलब्ध आहे. या योजनेची एकूण मुदत 25 वर्षे असून, मूल 18 वर्ष, 20 वर्षे आणि 22 वर्षांचे असेल तेव्हा मूळ रकमेच्या 20 टक्के परत दिली जाते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात