Home /News /money /

भारतीयांपेक्षा श्रीमंत झाले बांगलादेशी, 1.67 लाख रुपयांवर पोहोचलं दरडोई उत्पन्न

भारतीयांपेक्षा श्रीमंत झाले बांगलादेशी, 1.67 लाख रुपयांवर पोहोचलं दरडोई उत्पन्न

संबंधित नागरिक 1995 ते 2011 दरम्यान बांगलादेशातून भारतात अवैध पद्धतीनं आले आहेत.

संबंधित नागरिक 1995 ते 2011 दरम्यान बांगलादेशातून भारतात अवैध पद्धतीनं आले आहेत.

भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशने (Bangladesh) प्रगती केल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. देशाचं दरडोई उत्पन्न (Per Capita Income) असतं त्यामध्ये बांगलादेशने भारताला मागे टाकलं आहे.

नवी दिल्ली, 22 मे: कोरोना काळात (Covid-19) जवळपास सगळ्याच देशांमध्ये प्रादूर्भाव झाला आणि त्यात अनेकांचे मृत्यू झाले. दरम्यान  या देशांच्या अर्थव्यवस्थांना (Economy) फटका बसला. जनतेला मदत करण्यासाठी सरकारला आर्थिक मदत पॅकेज जाहीर करावी लागली, मेडिकल व्यवस्थेत पैसे खर्च झाले आणि दुसरीकडे कोरोनामुळे उद्योगधंदे काही काळ बंद होते. त्यामुळे देशाचं अर्थचक्र वेगाने फिरू शकलं नाही. पण याच काळात भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशने (Bangladesh) प्रगती केल्याचं दिसतंय. देशाचं दरडोई उत्पन्न (Per Capita Income) असतं त्यामध्ये बांगलादेशने भारताला मागे टाकलं आहे. 40 वर्षांपूर्वी अत्यंत मागास आणि गरीब देश म्हणून ओळख असणाऱ्या बांगलादेशने आता दरडोई उत्पनांत चांगलीच प्रगती केल्याचं दिसतंय. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये बांगलादेशातील दरडोई उत्पन्न 2227 डॉलर म्हणजे 1.62 लाख रुपये इतकं नोंदवलं गेलं. त्याआधीच्या आर्थिक वर्षात बांगलादेशचं दरडोई उत्पन्न 2064 डॉलर म्हणजे 1.46 लाख रुपये इतकं होतं. दरडोई उत्पन्नात झालेल्या वाढीमुळे बांगलादेशाने भारताला मागे टाकलं आहे. भारताचं दरडोई उत्पन्न 1947 डॉलर म्हणजे 1.47 लाख रुपयांहून थोडं जास्त आहे. हे वाचा-1.5 कोटी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून गिफ्ट! व्हेरिएबल DA मध्ये दुप्पट वाढ लॉकडाउनमुळे घटलं दरडोई उत्पन्न भारत सरकारने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे (Lockdown) देशात आर्थिक व्यवहार मंदावले होते. त्याचा परिणाम झाल्यामुळे देशातील दरडोई उत्पन्न कमी झालं आहे. बांगलादेशचे कॅबिनेट सेक्रेटरी अनवारूल इस्लाम म्हणाले की बांगलादेशाचं दरडोई उत्पन्न 2227 डॉलर इतकं झालं असून अर्थ व्यवस्थेच्या विकासाचा दर 9 टक्क्यांनी वाढला आहे. आयएमएफचा अंदाज अचूक ठरला गेल्या वर्षी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने (International Monetary Fund) अंदाज व्यक्त केला होता की 2020 या वर्षात दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत बांगलादेश भारताला मागे टाकेल. आयएमएफचा हा अंदाज अचूक ठरला आहे. प्रचंड लोकसंख्या असलेल्या बांगलादेशात स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात गरीबी होती. हे वाचा-बुलेट ट्रेनचा ड्रायव्हर गाडी सुरू असताना गेला लघुशंकेला; मोठी कारवाई 1971 मध्ये मिळालं होतं स्वातंत्र्य आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये बांगलादेशाने दरडोई उत्पन्नात खूपच चांगली प्रगती केली आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या बांगलादेशाने भारताला मागे टाकलं आहे. त्यामुळे त्याच दृष्टिनी पाहिलं तर बांगलादेशी नागरिक भारतीय नागरिकांपेक्षा श्रीमंत झाले आहेत. खरं तर आधी पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांगलादेशाला 1971 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. बांगलादेशाला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारताने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
First published:

पुढील बातम्या