मुंबई, 9 मार्च : इन्कम टॅक्स विभागाने करदात्यांना टॅक्स कॅल्क्युलेशन आणि त्यांना कोणती टॅक्स व्यवस्था सोयीस्कर आहे हे ठरवण्यात करण्यात मदत करण्यासाठी टॅक्स कॅल्क्युलेटर जारी केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून 2023 च्या अर्थसंकल्पात नवीन टॅक्स स्लॅब प्रस्तावित करण्यात आला होता. अशा स्थितीत यावेळी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची प्रक्रिया काही दिवसांत सुरू होणार आहे. यासोबतच यावेळी किती इन्कम टॅक्स कापला जाणार हेही जाणून घ्यायचे आहे.
क्रेडिट कार्ड वापरत असालच ना? मग ही माहिती असायलाच हवी, अन्यथा होईल नुकसान
इन्कम टॅक्स विभागाने केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, कलम 115 BAC नुसार व्यक्ती आणि सर्वांसाठी जुन्या आणि नवीन कर व्यवस्थांची तुलना करण्यासाठी आयकर वेबसाइटवर एक समर्पित कर कॅल्क्युलेटर उपलब्ध आहे. कर मोजण्यासाठी लोक या कर कॅल्क्युलेटरचा वापर करू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नाच्या आधारावर इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटरमधून कर मोजला जाऊ शकतो.
1 लाखांच्या FD वर वार्षिक व्याज किती मिळणार? आता झटपट सोडवा हे गणित
- इन्कम टॅक्स मोजून आर्थिक बजेट बनवता येते.
- जेव्हा एखाद्याला भरावा लागणारा टॅक्स माहिती असेल तर तो आपल्या खर्चाचे बजेट बनवू शकतो आणि योग्य बचतीचे निर्णय घेऊ शकतो.
- असे केल्याने एखादी व्यक्ती कर्जात जाणे आणि अधिक खर्च करणे टाळू शकते.
सध्या लोक दोन टॅक्स व्यवस्थांनुसार टॅक्स भरू शकतात. जर लोकांनी नवीन कर टॅक्स रिजीमनुसार टॅक्स भरला तर त्यांना स्टँडर्ड डिडक्शन व्यतिरिक्त कोणतीही सूट मिळणार नाही. दुसरीकडे, जर लोकांनी जुन्या टॅक्स रिजीममधून टॅक्स भरला तर ते अनेक प्रकारच्या टॅक्स सूटचा लाभ घेऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Income tax