मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /PNB Scam: नीरव मोदीच्या अडचणी वाढल्या; बहिण पूर्वी मोदी सरकारी साक्षीदार बनणार

PNB Scam: नीरव मोदीच्या अडचणी वाढल्या; बहिण पूर्वी मोदी सरकारी साक्षीदार बनणार

विशेष न्यायालयानं (Special Court) आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून नीरव मोदीची (Nirav modi) बहीण (Sister) पूर्वी मोदीला (Purvi modi) संबंधित खटल्यात सरकारी साक्षीदार (Government witness) बनण्याची परवानगी दिली आहे.

मुंबई, 06 जानेवारी: पंजाब नॅशनल बँक घोटाळा  (PNB Scam) प्रकरणी विविध बॅंकांचं कर्ज (Loan) बुडवून इंग्लंडला पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी (Nirav modi) याच्या अडचणींत आता वाढ होण्याची शक्यता आहे. कारण याप्रकरणी एका विशेष न्यायालयानं (Special court) आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून नीरव मोदीची बहीण पूर्वी मोदीला (Purvi modi) संबंधित खटल्यात सरकारी साक्षीदार (Government witness) बनण्याची परवानगी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी पूर्वी मोदीने सरकारी साक्षीदार बनण्यासंबंधित अर्ज न्यायालयात सादर केला होता. आता या अर्जाला मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) खटला हाताळणारे विशेष न्यायाधीश व्ही सी बर्डे यांनी सोमवारी मंजूरी दिली आहे. मंगळवारी याबाबतचा आदेश दिला जाणार आहे.

न्यायालयानं  यावेळी म्हटलं की, या प्रकरणी आरोपीनं (पूर्वी मोदी) माफी मागितल्यानंतर ती आता सरकारी साक्षीदार असेल. बेल्जियमची नागरीक असलेली पूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने दाखल एका खटल्यात आरोपी आहे. न्यायालयानं आदेशात म्हटलं आहे की, 'आरोपी सध्या परदेशात आहे. तिला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात येतील. त्यासाठी फिर्यादी पक्ष आवश्यक ती पावलं उचलेल.

(हे वाचा-ICICI Lombard आपल्या ग्राहकांना देऊ करते घरगुती आरोग्य सेवेचे लाभ)

आपल्या माफीच्या अर्जात पूर्वी मोदींनी सांगितलं की, ती मुख्य आरोपी नाही आणि तपास यंत्रणांनी तिची या प्रकरणात मर्यादित भूमिका असल्याच उघड केलं आहे. अंमलबजावणी संचालनालयाला आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करुन देऊन त्यांना पूर्णपणे सहकार्य केलं असल्याचंही पूर्वी मोदीनं म्हटलं आहे.

(हे वाचा-घरातील सोन्यावर व्याज मिळवण्याची संधी, सरकार या योजनेत बदल करण्याच्या तयारीत)

तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरव मोदी आणि त्यांचे मामा मेहुल चोक्सी यांनी काही बँक अधिकाऱ्यांशी मिळून पंजाब नॅशनल बँकेची 14,000 कोटींची फसवणूक केली आहे. ही फसवणूक हमी पत्राद्वारे (गॅरंटी पत्र) करण्यात आली होती.

First published: