नवी दिल्ली, 10 एप्रिल: गेल्या काही दिवसांपासून करदात्यांना प्राप्तिकर विभागाकडून (Income Tax Department Notice) नोटीस मिळत आहेत. कर न भरणाऱ्यांसाठी इन्कम टॅक्स विभाग मेसेज आणि ई-मेलच्या माध्यमातून नोटीस जारी करत आहे. या नोटीस पाठविल्या जात आहेत कारण कर विभागाकडे जो मिळालेल्या उत्पन्नाचा तपशील आहे तो करदात्यांच्या आयकर विवरणाशी (ITR) जुळत नाही आहे.
छोटीशी चूक पडेल महागात
वास्तविक, बँकेत फिक्स्ड डिपॉझिटवर मिळणारं व्याज पूर्णपणे करपात्र आहे, परंतु इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरताना लोकं अनेकदा हे विसरतात आणि आयटीआरमध्ये एफडीच्या व्याजातून मिळणारं उत्पन्न दाखवत नाहीत. या छोट्याशा चुकीमुळे कर विभाग करदात्यांना नोटीस पाठवत आहे.
नोटीस टाळायची असेल तर करा हे काम
जर इन्कम टॅक्स विभागाच्या नोटीसपासून तुम्हाला वाचायचे असेल कर ITR मध्ये Bank FD वर मिळणाऱ्या व्याजाची माहिती कर विभागाला द्या, मात्र तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक आहे की हा तपशील ITR मध्ये कसा भरावा. व्याजातून होणाऱ्या कमाईचा तपशील देण्यासाठी ITR मध्ये दोन पर्याय उपलब्ध आहेत. करदाते त्यांना व्याजातून मिळणारी कमाई ईयर ऑफ अॅक्रुअलसह (year of accrual) ईयर ऑफ रिसीप्ट (year of receipt)मध्ये दाखवू शकतात. म्हणजेच, दरवर्षी किंवा एफडीचा परतावा मिळेल त्यावर्षी देखील तुम्ही व्याजाचा तपशील देऊ शकता. पण कर तज्ज्ञ असा सल्ला देतात की, एफडीवर मिळणारे व्याज year of accrual मध्ये दर्शविले जावे.
(हे वाचा-5 सरकारी बँका शॉर्टलिस्ट, दोन बँकाच्या खाजगीकरणाविषयी 14 एप्रिलला होणार निर्ण)
बँकेकडून कापला जातो TDS
दरवर्षीच्या व्याजावर बँकेकडून टीडीएस कापला जातो, जो तुम्ही आयटीआर फॉर्म 26AS मध्ये दाखवू शकता. यामुळे टीडीएस आणि वार्षिक व्याजाच्या आकडेवारीमध्ये कोणताही फरक होणार नाही आणि कर विभागाच्या नियमाचे उल्लंघन होणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money