मराठी बातम्या /बातम्या /मनी /

तुमच्या कामाची बातमी! Car Loan घेत असाल तर काय करावं आणि काय करू नये? जाणून घ्या सविस्तर

तुमच्या कामाची बातमी! Car Loan घेत असाल तर काय करावं आणि काय करू नये? जाणून घ्या सविस्तर

Car Loan घेताना काय करावं काय करू नये वाचा

Car Loan घेताना काय करावं काय करू नये वाचा

कार घेण्यासाठी तुमच्याकडे काही रक्कम साठलेली नसेल, तरीदेखील तुम्ही कार घेऊ शकता.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 26 नोव्हेंबर: आजच्या काळात घर, वाहन घेणं अगदी सोपं झालं आहे. बँका, वित्तीय संस्था यासाठी अगदी सहजपणे स्वस्त दरात कर्ज (Loan) उपलब्ध करत असल्यानं आता नवीन घर, गाडी घेणं सर्वांना शक्य होत आहे. एके काळी सर्वसामान्य मध्यमवर्गीयांसाठी स्वप्नवत असलेल्या या गोष्टी आता सहजसाध्य झाल्या आहेत. आता एखादी महागडी कार (which Car is best?)  घेण्यासाठी लागणारी रक्कम बँक हप्त्याने (EMI) उपलब्ध करते. त्यामुळे अनेकांचं कार घेण्याचं स्वप्न (Dream) पूर्ण होत आहे. आजकाल अनेक मध्यमवर्गीयांच्या दारात त्यांच्या स्वप्नातली कार उभी राहिलेली दिसते; मात्र आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँक (Bank) किंवा वित्तीय संस्थेकडून (Financial Institute) कर्ज घेताना ते आपल्याला लाभदायक आहे याची खात्री करून घेणं आवश्यक आहे. कर्जाचा बोजा आपल्याला अडचणीत आणणारा ठरू नये यासाठी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. योग्य कर्जाची निवड करण्यासाठी काही बाबी लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याबाबतची ही माहिती.

आजकाल बाजारपेठेत अनेक कंपन्यांच्या विविध प्रकारच्या कार्स उपलब्ध असतात. आपल्याला कोणत्या कारणासाठी, किती व्यक्तींसाठी कार हवी आहे यासह कारमधली फीचर्स, सुविधा, रंग यावर कारची निवड ठरत असते. त्यानुसार एकदा कार मॉडेल (Best car model in 2021) निश्चित केलं, की किमतीच्या 80 ते 90 टक्के रक्कम बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज रूपाने घेता येते. काही बँका किंवा वित्तीय संस्था कारच्या ऑन रोड किमतीच्या (On Road Price) 100 टक्के कर्जही देतात. त्यामुळे डाउन पेमेंट (Standard down payment for car) म्हणजे काही रक्कम स्वतःच्या खिशातूनदेखील द्यावी लागत नाही. त्यामुळे कार घेण्यासाठी तुमच्याकडे काही रक्कम साठलेली नसेल, तरीदेखील तुम्ही कार घेऊ शकता. त्यासाठी वाट पाहत बसण्याची गरज नसते. वाहन कर्जामुळे ही एक अत्यंत उत्तम सुविधा निर्माण झाली आहे. फक्त नवीन कार नव्हे, तर सेकंडहँड कार (Secondhand Car) घेण्यासाठीही कर्ज मिळतं. या कारसाठीचा व्याजदरही कमी असतो. अनेक बँका, वित्तीय संस्था वाहन कर्ज (do’s and don’ts when choosing the right car loan) देत असल्यानं या क्षेत्रात चांगली स्पर्धा आहे. त्यामुळे ग्राहकांना आपल्या सोयीचं, अधिक स्वस्त दराने कर्ज देणारी बँक, वित्तीय संस्था निवडण्याची संधी असते. त्याकरिता काही बाबी बारकाईने जाणून घेणं आवश्यक आहे.

Mutual Fund की Shares? कोणती गुंतवणूक फायद्याची आणि कुठे जोखीम जास्त; वाचा इथे

याकरिता सर्वांत आधी वेगवेगळ्या बँका, वित्तीय संस्था यांच्याकडून तुम्हाला देण्यात येणाऱ्या कर्जाची तुलना (Comparison) करावी. काही संस्था, त्यांच्या निकषात तुम्ही बसत असाल आणि त्यांच्याकडे सुविधा असेल तर 100 टक्के कर्ज देतात. काही बँका 80 ते 90 टक्के कर्ज देतात. त्याबरोबर त्यांच्या काही अटी, नियम असतात. त्यांची माहिती करून घ्यावी आणि त्यानुसार सर्व पर्यायांची तुलना करावी. त्यानंतर बँका, वित्तीय संस्था यांच्या कर्जाच्या व्याजदराची (Interest Rate) तुलना करावी आणि कमी दराने तुम्हाला आवश्यक रक्कम देणाऱ्या कर्जाची निवड करावी. कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी कोणती कार घ्यायची आहे, ते निश्चित करावं. तिची किंमत आणि मिळणारं कर्ज हे तुमच्या बजेटमध्ये (Budget) बसत असल्याची खात्री करून घ्यावी. अनेकदा बँका, वित्तीय संस्था यांच्याकडून काही शुल्क आकारलं जातं. त्याची माहिती आधीच जाणून घ्यावी. तसंच काही, बँका, वित्तीय संस्था विशेष ऑफर्सही (Offers) देतात. त्यांचीही सविस्तर माहिती घ्यावी आणि त्यानंतर आपल्याला अधिक फायद्याचा पर्याय निवडावा.

कोणत्याही कारसाठी दर वर्षी विमा काढावा लागतो. कारच्या देखभाल खर्चासह (Servicing) विम्याचा खर्च (Insurance Premium) वार्षिक असतो. त्यामुळे तुम्ही निवडलेल्या कारसाठी विम्याचा खर्च किती येणार आहे याचीही आधी माहिती करून घ्यावी. विम्याच्या हप्त्याचा खर्च बजेटमध्ये बसत असल्याची खात्री करून घ्या.

वाहन कर्ज घेताना तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक रकमेच्या कर्जासाठी अर्ज करू नये. तो नामंजूर होण्याची शक्यता अधिक असते. एकापेक्षा अधिक ठिकाणी अर्ज करू नये. यामुळे तुमच्याविषयी नकारात्मक मत निर्माण होऊ शकतं. एका बँकेकडून कर्ज नामंजूर झालं, तर दुसऱ्या बँकांकडे कर्जासाठी अर्ज करू नये. तिथेही कर्ज नाकारलं जाण्याची शक्यता वाढते. आजकाल डीलर्सकडूनही कर्जाची सुविधा पुरवली जाते; मात्र तिथे व्याजदर सर्वोत्तम मिळेल याची शक्यता नसते. त्यामुळे इतर पर्यायांचाही अभ्यास करावा. ज्या कारसाठी देखभाल खर्च अधिक असतो, अशा कारची निवड शक्यतो करू नका. कारण कारच्या कर्जाचा हप्ता आणि विमा हप्ता यासह देखभाल खर्चाचा भार सोसणं अवघड ठरू शकतं.

नवी कार घेताय? Car loan घेताना आवश्यक आहेत हे पात्रता निकष आणि कागदपत्रं

या सगळ्या बाबींचा विचार करून कर्ज घेतल्यास त्याचा बोजा न वाटता अगदी सहजपणे त्याची परतफेड करणं शक्य होईल. त्यामुळे तुमच्या आवडीची कार घ्यायची असेल तर बँका, वित्तीय संस्था मदतीसाठी सज्ज आहेतच; पण कर्ज घेताना कमी व्याजदर, जास्तीत जास्त कर्ज रक्कम, शुल्क सवलत, इतर सवलती यांची तुलना करून योग्य पर्याय निवडणं आवश्यक आहे. पुढील खर्चाचा विचार करून कर्ज रक्कम ठरवणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे कारसाठी कर्ज घेताना सर्व बाबींचा विचार करून घेतलेलं कर्ज योग्य ठरतं. त्याचा बोजा न होता, कारचं सुख अनुभवता येतं.

First published:

Tags: Car, Loan, Money