मुंबई, 14 मे : माणसाच्या आयुष्यात कोणतीही समस्या सांगून येत नाही. सध्याच्या जीवनशैलीत अनेक प्रकारचे आजार वाढत आहेत. गेल्या काही वर्षांत आपल्या देशात वाढत्या आजारांमुळे रुग्णालय आणि वैद्यकीय सेवांचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या काळा (Corona Crises)त लोकांना आरोग्य विम्याचे (Health Insurance) महत्त्व समजले आहे. तज्ज्ञांच्या मते प्रत्येकाला आरोग्य विमा पॉलिसीची गरज असते. काही लोक स्वस्त पॉलिसी खरेदी करतात किंवा त्यांच्या अटी आणि शर्तींकडे लक्ष देत नाहीत. अशा परिस्थितीत क्लेम सेटलमेंटच्या (Claim Settlement) वेळी अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. क्लेम सेटलमेंट आरोग्य विमा घेताना, सर्वात महत्त्वाचा विचार केला जातो तो क्लेम निकाली काढणे. जर एखादी कंपनी विमा पॉलिसीमध्ये ग्राहकांना क्लेम सेटलमेंट सहज प्रदान करत नसेल अशा परिस्थितीत त्यांना नंतर खूप त्रास सहन करावा लागतो. RenewBuy चे सह-संस्थापक इंद्रनील चॅटर्जी म्हणतात की, इंडस्ट्री आज क्लेम सेटलमेंटच्या बाबतीत सहकार्याने काम करत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत ट्रेडिशनल-डिजिटल मॉडेल मोठ्या प्रमाणावर सेटलमेंटसाठी एकत्र येत आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की पॉलिसीधारकांनी काही टिप्स आणि ट्रिक्स देखील जाणून घेतल्या पाहिजेत जेणेकरुन त्यांना क्लेम सेटलमेंटमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये. mAadhaar App: कुटुंबातील सर्वांचं आधार कार्ड प्रोफाईल एकाच ठिकाणी करा सेव्ह; चेक करा संपूर्ण प्रोसेस वेटिंग पीरियड आरोग्य विमा खरेदी करताना, प्रतीक्षा कालावधी देखील लक्षात ठेवावा. काही पॉलिसी एक किंवा दोन वर्षांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर अस्तित्वात असलेल्या आजारांना कव्हर करतात. अशा परिस्थितीत, अशी पॉलिसी घेतली पाहिजे ज्याचा प्रतीक्षा कालावधी कमी असेल. प्रतीक्षा कालावधीपूर्वी तुम्ही आजारी पडल्यास, क्लेमला विलंब होतो. FD मधील पैसेही होणार कमी! महागाई तुमच्या खिशावर कशी मारतेय डल्ला? घरचं बजेट आता नव्याने करावं लागणार नियम आणि अटी कोणतीही पॉलिसी घेण्यापूर्वी, त्यातील अटी आणि नियम काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. अटी आणि शर्तींकडे लक्ष न देणाऱ्यांना भविष्यात अडचणी येतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विम्यासाठी योग्य रक्कमही निवडली पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कुटुंबातील सदस्यांना पॉलिसीमध्ये समाविष्ट केले पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.