जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Car Loan घेताना घाई न करता 'या' गोष्टी लक्षात ठेवा; आर्थिक नुकसान होणार नाही

Car Loan घेताना घाई न करता 'या' गोष्टी लक्षात ठेवा; आर्थिक नुकसान होणार नाही

Cheapest Car Loan: नवीन कार घ्यायचा विचार करताय? ‘या’ बँका देतायेत 8 टक्क्यांपेक्षा कमी व्याजदराने कर्ज

Cheapest Car Loan: नवीन कार घ्यायचा विचार करताय? ‘या’ बँका देतायेत 8 टक्क्यांपेक्षा कमी व्याजदराने कर्ज

वाहन कर्ज (Car Loan) घेण्यापूर्वी अनेक गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. कर्ज घेताना लक्षात ठेवायला हव्यात अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आम्ही येथे सांगत आहोत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 फेब्रुवारी : जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल आणि कारसाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची ठरू शकते. कारचे मॉडेल, फीचर्स, लूक आणि किंमत यावर कार लोनचा विचार करावा लागतो. विमा क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कार लोन घेताना लोक अनेकदा अशा चुका करतात, ज्यामुळे त्यांना क्लेमच्या वेळी समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वाहन कर्ज (Car Loan) घेण्यापूर्वी अनेक गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. कर्ज घेताना लक्षात ठेवायला हव्यात अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आम्ही येथे सांगत आहोत. तुम्ही किती कर्ज मॅनेज करू शकता? कार लोन घेण्यापूर्वी, दर महिन्याला तुम्ही किती हप्त्याचा भार उचलू शकाल याचा विचार करा. कदाचित तुम्ही इतर कर्जावर देखील EMI भरत असाल. त्यामुळे बजेटचे योग्य नियोजन करा. कार कर्जाच्या वेळी डाउनपेमेंट रक्कम देखील समाविष्ट करा. PMSBY Scheme: केवळ एक रुपयात मिळवा विमा कवच; दोन लाखांपर्यंत लाभ मिळतील रीपेमेंट टाळा बहुतेक लोक कार कर्जाच्या परतफेडीसाठी दीर्घ कालावधीची निवड करतात. आपल्याला दीर्घकालीन परतफेड कमी वाटते. पण तुम्ही कारच्या किमतीपेक्षा जास्त पैसे व्याज म्हणून देता. तुम्ही जितका कमी परतफेडीचा कालावधी निवडाल तितका तुमचा फायदा होईल. हे समजून घेण्यासाठी तुम्ही एखाद्या तज्ज्ञांची किंवा ईएमआय कॅल्क्युलेटरची (Car Loan EMI calculator) मदत घेऊ शकता. Card Protection Plan : Debit, Credit कार्ड हरवलं तरी नो टेन्शन; नुकसान झाल्यास मिळेल भरपाई काही गोष्टींची आधीच माहिती घ्या कर्ज घेण्यापूर्वी, विविध कार लोनची तुलना करा, त्यांची वैशिष्ट्ये समजून घ्या. आजकाल कार लोन मिळणे फार कठीण नाही. खूप विचार करून हे ठरवण्यातच शहाणपण आहे. झीरो डाऊन पेमेंट टाळा कर्ज घेताना झिरो डाउन पेमेंट स्कीमबद्दल ऐकणे नक्कीच चांगले वाटते. मात्र यासाठी तुम्हाला जास्त रक्कम भरावी लागेल. झीरो डाउन पेमेंट स्कीम टाळण्याचा प्रयत्न करा. डाउन पेमेंटमध्ये जास्तीत जास्त पैसे टाकण्याचा प्रयत्न करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात