मुंबई आणि परिसराला पावसानं झोडपलं, 10 महत्त्वाचे अपडेट्स

मुंबई आणि परिसराला पावसानं झोडपलं, 10 महत्त्वाचे अपडेट्स

काहीशा विश्रांतीनंतर मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

  • Share this:

मुंबई, 8 जुलै : मुंबई आणि उपनगरांमध्ये आज पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. याचा लोकल सेवेवरही परिणाम झाल्याचं दिसून आलं.

सकाळपासून झालेल्या पावसाचा परिणाम, 10 महत्त्वाचे अपडेट्स

1. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये 3 ते 4 फुट पाणी जमा झाले. त्यामुळे सबवे पूर्ण भरलेला पहायला मिळत आहे. परिणामी अंधेरी पूर्व ते पश्चिम जाणारा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. पाणी भरल्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालक यांच्यासाठी हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला.

2. कांजूरमार्गजवळ ट्रॅकवर पाणी आलं होतं

3. मुसळधार पावसामुळे ट्रॅकवर पाणी साचलं. परिणामी मध्य रेल्वेवरील लोकल वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरा सुरू होती.

4. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरात अधून मधून पावसाच्या सरी

5. रविवारच्या विश्रांती नंतर पूर्व उपनगरात पावसाची जोरदार सुरुवात. मुलुंड,विक्रोळी, घाटकोपर,कुर्ला चेंबूर बीकेसी परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे.

6. घाटकोपर पश्चिमेला रेल्वे स्टेशन बाहेरही पाणी भरल्याचं दिसून आलं.

7. नवी मुंबई, पनवेल परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे.

8. सायन, गांधी मार्केटला पाणी भरलं, बेस्ट ची वाहतूक वळवण्यात आली.

9. आज सकाळपासून तुरळक पाऊस सुरू होता. पण गेल्या तासाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर अधिक असला तरी लोकलसेवा आता सुरळीत झाली असल्याची माहिती आहे.

10. दुपारी चार वाजताभरती येणार आहे.

मुंबईकरांनो, आज घराच्या बाहेर पडण्याआधी हा VIDEO नक्की

First published: July 8, 2019, 1:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading