मराठी बातम्या /बातम्या /मनी /

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर! ही कंपनी करणार 600 जणांची भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर! ही कंपनी करणार 600 जणांची भरती

जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्याकडे एक आनंदाची बातमी आहे. टेक महिंद्रा (Tech Mahindra) ग्रुपमधील कंपनी असणारी कॉमव्हिवा (Comviva Jobs) जुलै 2022 पर्यंत जवळपास 600 इंजिनिअर्सची भरती करणार आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 13 डिसेंबर: जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्याकडे एक आनंदाची बातमी आहे. टेक महिंद्रा (Tech Mahindra Jobs) ग्रुपमधील कंपनी असणारी कॉमव्हिवा (Comviva Jobs) जुलै 2022 पर्यंत जवळपास 600 इंजिनिअर्सची भरती करणार आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विकासासाठीच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्याचा प्रभाव कमी करण्यासाठी ही नवी भरती आवश्यक आहे.

कॉमव्हिवा ही कंपनी मोबाइल डिव्हाइस आधारित अॅप्स आणि टेक्नॉलॉजीसाठी आयटी सोल्यूशन देते. कॉमव्हिवाचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर मनोरंजन महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता कंपनीचे लक्ष्य टिअर टू शहरांवर आहे आणि याअंतर्गतच भुवनेश्वर सेंटरचा विस्तार केला जात आहे. हे सेंटर नवीन स्ट्रॅटेजीअंतर्गत तीन वर्षांपूर्वी उघडण्यात आले होते.

महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉमव्हिवाच्या टीममध्ये जवळपास 2000 मेंबर्स आहेत. आम्ही वर्षाकाठी जवळपास 600 जणांची भरती करू. यातील जवळपास 300 जणांचे हायरिंग थेट विद्यापीठांतून होईल आणि इतर 200-300 जणं अनुभवी असतील.'

हे वाचा-नवीन वर्षात ग्राहकांना झटका! महागणार या तुमच्या आवडीच्या कंपन्यांची वाहनं

20-23 टक्के झाली आहे एट्रिएशन रेट

कंपनीते गेल्या काही तिमाहीपासून नोकरी सोडण्याचा दर अर्थात एट्रिएशन रेट (Attrition Rates) वाढून 20-23 टक्के झाला आहे, आधी हा दर 15-16 टक्के होता. महापात्र यांनी म्हटले आहे की कंपनीची योजना जुलै 2022 पर्यंत 600 जणांची भरती करण्याची आहे आणि भुवनेश्वर केंद्रातील मनुष्यबळ वाढवण्यासाठी यानंतरही भरती सुरूच राहणार आहे.

हे वाचा-हाय रिटर्न मिळवताना सतर्क राहा, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा इशारा

चालू आर्थिक वर्षात कंपनीला 10-12 टक्के वाढ अपेक्षित

महसूल वाढीबाबत ते म्हणाले की, कंपनीला चालू आर्थिक वर्षात 10-12 टक्के वाढ अपेक्षित आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात Comviva चा महसूल 845.1 कोटी होता.

First published:

Tags: Tech Mahindra