मराठी बातम्या /बातम्या /मनी /जिओचे हे भन्नाट प्लॅन्स पाहिलेत का? एकाच रिचार्जमध्ये मिळेल अनेक फोन्सवर सुविधा

जिओचे हे भन्नाट प्लॅन्स पाहिलेत का? एकाच रिचार्जमध्ये मिळेल अनेक फोन्सवर सुविधा

जिओचे भन्नाट प्लॅन्स

जिओचे भन्नाट प्लॅन्स

तीन जणांसाठी रिचार्ज प्लॅन हवा असेल, तर 799 रुपयांचा रिचार्ज प्लॅन निवडू शकता.

 • Local18
 • Last Updated :
 • Mumbai, India

  नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी: जिओ कंपनी प्रीपेड रिचार्ज प्लॅन्ससह विविध पोस्टपेड प्लॅन्ससुद्धा ऑफर करते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रकारचे प्लॅन्स आहेत. या प्लॅन्समध्ये युझर्सना कॉल, डेटासोबतच अन्यही अनेक लाभ मिळतात. एकापेक्षा जास्त सिम कार्डसुद्धा या प्लॅनमध्ये जोडता येतात. ‘आजतक’ने याबाबत माहिती देणारं वृत्त दिलंय. जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन्स मिळतात. कंपनी अनेक प्रकारचे स्वस्त, महाग प्लॅन ऑफर करते. जिओ पोस्टपेड युझर्स असलात, तर तुम्हाला कंपनीकडून एका खास ऑफरचा लाभ मिळू शकतो. तो म्हणजे, जिओ फॅमिली रिचार्ज प्लॅनचा. म्हणजेच एका रिचार्जमध्ये अनेक जणांचे फोन चालू शकतात.

  कंपनी असे अनेक प्लॅन्स ऑफर करते, ज्यामध्ये दोन युझर्स ते चार युझर्ससाठी एकच प्लॅन असतो. जिओचे पोस्टपेड प्लॅन्स 399 रुपयांपासून सुरू होतात. परंतु फॅमिली प्लॅनसाठी तुम्हाला किमान 599 रुपये खर्च करावे लागतील. या प्लॅनमध्ये, मुख्य युझर्सशिवाय, इतर युझर्सचंही सिम कार्ड चालतं. या प्लॅनची माहिती जाणून घेऊ या.

  Jio चा सर्वात बेस्ट बजेट फ्रेण्डली Plan, 231 रुपयांत मिळणार या सुविधा

  दोनपेक्षा जास्त व्यक्तींसाठी रिचार्ज प्लॅन

  तीन जणांसाठी रिचार्ज प्लॅन हवा असेल, तर 799 रुपयांचा रिचार्ज प्लॅन निवडू शकता. यामध्ये 150 जीबी डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये मुख्य युझर्ससह एकाच वेळी दोन अतिरिक्त ग्राहक जोडले जाऊ शकतात. जिओचा हा प्लॅन अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएससह येतो. यामध्ये युझर्सना ओटीटी प्लॅन सबस्क्रिप्शन मिळतं. चार युझर्ससाठी जिओचा फॅमिली प्लॅन 999 रुपयांचा आहे.

  तुम्हाला आलाय का SIM बदलण्याचा SMS? सावधान तुमच्यासोबत हे घडू शकतं

  खास दोन व्यक्तींसाठी प्लॅन

  599 रुपयांचा हा जिओचा सर्वांत स्वस्त फॅमिली प्लॅन आहे. यामध्ये युझर्सला प्रत्येक बिलिंग सायकलसाठी 100 जीबी डेटा मिळतो. डेटा लिमिट संपल्यानंतर युझर्सना प्रति जीबी 10 रुपये बिल द्यावं लागतं. जिओ प्लॅनमध्ये ग्राहकांना 200 जीबी डेटा रोल ओव्हरची सुविधादेखील मिळते. म्हणजेच, तुम्ही तुमचा डेटा नंतरसुद्धा वापरू शकता. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह दररोज 100 एसएमएसदेखील उपलब्ध आहेत. याशिवाय, युझर्सना जिओ टीव्ही, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउड सुविधा वापरता येते. कंपनीच्या रिचार्ज प्लॅनसह नेटफ्लिक्स मोबाइल सबस्क्रिप्शनदेखील मिळतं. याशिवाय युझर्सना एका वर्षासाठी अॅमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शनसुद्धा मिळतं. तुम्ही एखाद्या चाांगल्या फॅमिली प्लॅनच्या शोधात असाल, तर जिओचे फॅमिली प्लॅन तुमच्याासाठी उपयुक्त ठरू शकतात.

  First published:
  top videos

   Tags: Reliance Jio