मुंबई : सध्या सगळीकडे Jio चा बोलबाला आहे. 5G नेटवर्क आल्यानंतर तर Jio ची मागणी जास्तच वाढली आहे. Jio आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे बजेटफ्रेण्डली प्लॅन आणत असतं. आता Jio ने नुकसात धमाकेदार प्लॅन लाँच केला आहे. 250 रुपयांपेक्षाही हा प्लॅन कमी आहे. यामध्ये ग्राहकांना SMS, डेटा आणि कॉलिंग मोफत मिळणार आहे.
ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन, रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी 23 दिवस, 28 दिवस, 30 दिवस, 3 महिने, 365 दिवसांचे प्लॅन आणला आहे. जिओच्या जास्त व्हॅलिडिटी प्लॅनमध्ये 336 दिवसांचा प्लॅन देखील आहे, ज्यामध्ये ग्राहकांना 11 महिने आणि 6 दिवसांची वैधता मिळते.
Jio 11 महिन्यांच्या वैधतेच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉल, डेटा प्लॅन आणि मोफत SMS सेवा देखील प्रदान करते. तुम्हीही दीर्घ वैधतेसह योजना शोधत असाल, तर ही ३३६ दिवसांची योजना तुमच्यासाठी उपयुक्त आणि फायदेशीर ठरू शकते.
तुम्हाला आलाय का SIM बदलण्याचा SMS? सावधान तुमच्यासोबत हे घडू शकतं
जो ग्राहक हा प्लॅन घेईल त्याला साधारण 11 महिन्यांची वैधता मिळणार आहे. जिओच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी इंटरनेट डेटा मिळतो. तुमच्याकडे 11 महिन्यांसाठी वापरण्यासाठी 504GB डेटा असेल. जर आपण कॉलिंगबद्दल बोललो तर Jio ग्राहकांना या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग मिळेल. याशिवाय दररोज १०० एसएमएस मोफत उपलब्ध आहेत.
याशिवाय ग्राहकांना प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सह Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे. म्हणजेच हे अॅप्स तुम्ही मोफत वापरू शकता. जिओच्या 11 महिन्यांसाठी 2,545 रुपयांच्या प्लॅननुसार, प्रत्येक महिन्याचा खर्च सुमारे 231 रुपये येतो. त्यानुसार, ही योजना तुमच्या मासिक योजनेच्या तुलनेत अतिशय किफायतशीर योजना आहे.
Airtel prepaid recharge hike : ग्राहकांना मोठा झटका! 'या' कंपनीने वाढवले रिचार्जचे दर
ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉल, एसएमएस, 504GB इंटरनेट दरमहा 231 रुपयांमध्ये मिळत आहे. तुम्हाला कदाचित हे महिन्याच्या रिचार्ज प्लॅन मिळणार नाही. हे रिचार्ज केल्याने सुरुवातीला तुमच्या खिशाला थोडा खर्च होऊ शकतो, पण महिन्याचा खर्च आणि फायदे लक्षात घेता हा प्लॅन जास्त फायदेशीर असल्याचं लक्षात येतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Reliance Jio, Reliance Jio Internet