कोरोनानंतर ऑनलाईन खरेदी विक्री आणि तेवढ्याच प्रमाणात हॅकिंग फसवणुकीची प्रकरणं वाढत गेल्याचं पाहायला मिळत आहे.
सध्या E KYC, बिल भरणे, 5G, सिम बंद होणे अशा अनेक कारणांनी फसवणुकीचे प्रमाण वाढ आहे. आता हॅकर्सनी नवीन फंडा शोधून काढला आहे
तुम्हाला तुमचं सिम बंद झाल्याचा किंवा होणार असल्याचा SMS पाठवतात. तुम्ही नवीन सिम घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा असं सांगतात.
तुम्हाला जर असा कोणताही SMS आला असेल तर वेळीच सावध व्हा! Jio कडून ग्राहकांना अशा मेसेजकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन
कोणत्याही लिंकवर क्लीक करु नका, OTP शेअर करु नका. तुमची कोणतीही माहिती शेअर करु नका, त्यामुळे नुकसान होऊ शकतं
तुमची एक चूक तुमची सगळी माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचवू शकते. तुम्हाला सिम बदलण्यासाठी मेसेज आला तर क्लीक करु नका