नवी दिल्ली, 24 जून: रिलायन्स इंडस्ट्रीजची (Reliance Industries) 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज, 24 जून रोजी सुरू झाली आहे. दुपारी दोन वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (Video Conferencing) आणि अन्य ऑडिओ-व्हिज्युअल (Audio-Video Aids) माध्यमांमधून ही सभा पार पडत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) या सभेत तीन कोटींहून अधिक शेअरधारकांशी (Shareholders) संवाद साधत आहेत. या सभेच्या सुरुवातीला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांच्यासह आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि नीता अंबानी यांनी कोरोनामध्ये मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. तसंच या सभेत त्यांनी काही महत्त्वपूर्ण घोषणाही केल्या आहे.
यावर्षी शैक्षणिक सत्र जिओ इन्स्टिट्यूट (Jio Inistitute) सुरू करण्याची मोठी घोषणा रिलायन्सकडून करण्यात आली आहे. कोरोना काळातही विकास कामं सुरुच राहतील याला प्राधान्य असल्याचं नीता अंबानी (Nita Ambani) यांनी सांगितलं. आम्ही सर्वांसाठी शिक्षण आणि क्रिडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. जिओ इन्स्टिट्यूट यावर्षी नवी मुंबईतील त्यांच्या कॅम्पसमध्ये शैक्षणिक सत्र सुरू करणार असल्याचंही त्या म्हणाल्या.
जिओ इन्स्टिट्यूट संशोधन, नाविन्य आणि जागतिक स्तरावरील व्यासपीठ असलेली शैक्षणिक संस्था आहे. हे इन्स्टिट्यूट नवीन पिढी तयार करेल, जे भारत आणि जगाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देतील, असंही नीता अंबानी म्हणाल्या.
डिस्क्लेमर: https://lokmat.news18.com/ चालविणार्या नेटवर्क 18 आणि टीव्ही 18 या कंपन्या स्वतंत्र मीडिया ट्रस्टच्या नियंत्रणाखाली आहेत, याचा रिलायन्स इंडस्ट्रीज एकमेव लाभार्थी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mukesh ambani, Nita ambani, Reliance, Reliance group, Reliance Industries, Reliance Industries Limited, Reliance Jio