मराठी बातम्या /बातम्या /मनी /

जिओ ट्रू 5G चं जाळं विस्तारलं; देशभरातल्या आणखी 50 शहरांमध्ये आजपासून जिओची 5G सेवा सुरू!

जिओ ट्रू 5G चं जाळं विस्तारलं; देशभरातल्या आणखी 50 शहरांमध्ये आजपासून जिओची 5G सेवा सुरू!

Jio True 5G

Jio True 5G

रिलायन्सच्या जिओ कंपनीने आपलं ट्रू 5G नेटवर्क आता देशातल्या आणखी 50 शहरांत उपलब्ध करून दिलं आहे. त्यामुळे देशातल्या महत्त्वाच्या 184 शहरांमध्ये आता जिओ 5G नेटवर्कची सेवा सुरू झाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Mohini Vaishnav

मुंबई : 50 शहरांमध्ये आज (24 जानेवारी 2023) या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. आता जिओ 5G नेटवर्क गोवा, हरियाणा आणि पुदुच्चेरी या 3 नव्या राज्यांमध्ये पोहोचलं आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते आज कोटामध्ये या सेवेचा शुभारंभ होणार आहे, तर हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांच्या हस्ते हरियाणा सर्कलमधल्या 5G नेटवर्क सेवेचं उद्घाटन होणार आहे. यापैकी बहुतांश शहरांमध्ये 5G नेटवर्क सुरू करणारी जिओ ही पहिली व एकमेव कंपनी आहे.

या शहरांमधल्या ग्राहकांना जिओकडून वेलकम ऑफर देण्यात आली आहे. त्या ग्राहकांना आजपासून कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 1 Gbps पेक्षा अधिक स्पीडने अनलिमिटेड डेटा उपलब्ध होईल. “देशातल्या 17 राज्यं व केंद्रशासित प्रदेशांमधल्या 50 शहरांमध्ये जिओची 5G सेवा आजपासून सुरू होतेय. त्यामुळे आता देशभरातल्या एकूण 184 शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे. 5G नेटवर्कच्या विस्ताराचं हे देशातलंच नाही, तर जगभरातलंही एकमेव उदाहरण असेल,” असं जिओच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं.

घरात किती कॅश ठेवणे योग्य? काय आहे लिमिट? जाणून घ्या Income Tax विभागाचे नियम

 जिओच्या सर्व ग्राहकांना ट्रू 5G तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, यासाठी नेटवर्कमध्ये आवश्यक ते सर्व बदल करण्यात आल्याचं जिओनं म्हटलंय. डिसेंबर 2023पर्यंत संपूर्ण देशाला जिओ ट्रू 5G नेटवर्कचा लाभ घेता येईल, असंही जिओकडून सांगण्यात आलंय. सध्या आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, गोवा, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पुदुच्चेरी, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू, तेलंगण, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही राज्यं व केंद्रशासित प्रदेशांतल्या 50 शहरांमध्ये जिओनं 5G नेटवर्क सुरू केलंय. महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, नांदेड-वाघाळा आणि सांगली या शहरांमध्ये ही सेवा सुरू झालीय.

बँक लॉकर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, RBI ने जारी केल्या नव्या गाडइडलाइन्स!

 जिओने आपल्या ट्रू 5G नेटवर्कबाबत काही खुलासे केले आहेत. हे नेटवर्क ट्रू 5G नेटवर्क का आहे, यामागची काही कारणंही जिओनं स्पष्ट केली आहेत. या 5G नेटवर्कचं 4G वर जराही अवलंबित्व नाही, असं कंपनीने सांगितलं. 5G स्पेक्ट्रमच्या 700 MHz, 3500 MHz आणि 26 GHz बँड्सचं सर्वांत मोठं व उत्तम एकत्रीकरण करून हे नेटवर्क तयार करण्यात आलंय. Carrier Aggregation या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे या सर्व फ्रिक्वेन्सीजचं एकाच डेटा हायवेमध्ये रूपांतर होतं आणि ग्राहकांना विनाखंड अनुभव मिळतो, असं जिओने म्हटलं आहे. देशभरातल्या अनेक ग्राहकांना आता जिओच्या 5G नेटवर्कच्या सेवेचा लाभ घेता येईल.

First published:

Tags: 5G, Reliance Jio, Reliance Jio Internet