मराठी बातम्या /बातम्या /मनी /Home Loan : चांगल्या Credit Score चा होईल फायदा; 6.65 टक्के दराने गृहकर्ज मिळेल

Home Loan : चांगल्या Credit Score चा होईल फायदा; 6.65 टक्के दराने गृहकर्ज मिळेल

Bajaj Housing Finance चे म्हणणे आहे की, 6.65 टक्के दराने गृहकर्ज मिळवण्यासाठी ग्राहकाला किमान 800 चा CIBIL स्कोअर असणे आवश्यक असल्याचे कंपनीने म्हटलं आहे. मात्र ज्यांचा क्रेडिट स्कोअर 750 ते 799 दरम्यान आहे ते देखील कमी दराने गृहकर्ज घेऊ शकतात.

पुढे वाचा ...

मुंबई, 29 डिसेंबर : हाऊसिंग फायनान्स कंपनी बजाज हाऊसिंग फायनान्सने (Bajaj Housing Finance) बुधवारी नवीन फेस्टिव्ह डीलची घोषणा केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की ते चांगले क्रेडिट स्कोअर (Credit Score) असलेल्या लोकांना किमान 6.65 टक्के व्याजदराने गृहकर्ज (Home Loan) देईल. बजाज हाऊसिंग फायनान्सच्या मते, उद्योगात प्रथमच, हाऊसिंग फायनान्स कंपनी (Housing Finance Company) पात्र घर खरेदीदारांना त्यांच्या गृहकर्जाचे दर रेपो दराशी जोडण्याचा पर्याय देत आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स ही बजाज फायनान्सची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.

रेपो रेटमधील कपातीचा थेट फायदा

बजाज हाऊसिंग फायनान्सचे म्हणणे आहे की, गृहकर्जाचे दर रेपो रेटशी जोडल्याने ग्राहक RBI ने केलेल्या दरात कपातीचा लाभ घेऊ शकतील. 6.65 टक्के दराने गृहकर्ज मिळवण्यासाठी ग्राहकाला किमान 800 चा CIBIL स्कोअर असणे आवश्यक असल्याचे कंपनीने म्हटलं आहे. मात्र ज्यांचा क्रेडिट स्कोअर 750 ते 799 दरम्यान आहे ते देखील कमी दराने गृहकर्ज घेऊ शकतात.

नव्या वर्षात 'या' बँकेत 10 हजारांहून अधिक रक्कम जमा केल्यास लागणार शुल्क

PM आवास योजनेचा लाभ देखील घेऊ शकता

कंपनीचे म्हणणे आहे की ग्राहक 5 कोटी किंवा त्याहून अधिक कर्ज घेऊ शकतात. ग्राहक विद्यमान कर्जे ट्रान्सफर करणे, 1 कोटी रुपये किंवा त्याहून अधिकचे टॉप-अप कर्ज घेणे प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PMAY) व्याज अनुदानाचा लाभ घेऊ शकतात.

नवीन वर्षात पेट्रोल 25 रुपयांनी स्वस्त, या राज्याच्या CMचं जनतेला मोठं गिफ्ट

सरकारी कंपनी, बहुराष्ट्रीय कंपनीत किमान तीन वर्ष काम करणारे कर्मचारी या योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर तीन वर्षांचा कामाचा अनुभव असलेले डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट यांनाही कर्ज योजनेचा लाभ घेता येईल. ग्राहक 26 जानेवारी 2022 पर्यंत कंपनीच्या वेबसाइटवरून कर्जासाठी अर्ज करू शकतात.

First published:
top videos

    Tags: Home Loan, Money