Home /News /money /

घर शोधताय? मग दुसरीकडे कुठे जायची गरज नाही, सरकारने सुरू केली नवी सेवा

घर शोधताय? मग दुसरीकडे कुठे जायची गरज नाही, सरकारने सुरू केली नवी सेवा

घर खरेदी करताना सर्वात आधी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची तर ती म्हणजे बिल्डरची विश्वासार्हता. बिल्डरच्या जुन्या रेकॉर्डवर नजर टाकणं आवश्यक आहे. तसेच त्याची आर्थिक स्थिती चांगली आहे की नाही याची चौकशी करणंही आवश्यक आहे.

    नवी दिल्ली, 14 जानेवारी : घर खरेदी करणाऱ्यांसाठी (Home Buyers) एक चांगली बातमी आहे. तुम्हाला आता घर शोधण्यासाठी तुम्हाला आता दुसरीकडे कुठे जाण्याची गरज नाही. विकासकांची संस्था असलेल्या 'नरेडको' ने housing for all.com या नावाने एक E कॉमर्स प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. या पोर्टलमध्ये नामांकित डेव्हलपर्ससोबतच SBI, Axix, टाटा कॅपिटल, ICICI यासारख्या आर्थिक संस्थांचा समावेश आहे. नरेडको housing for all.com वर दीड महिन्यांचा फेस्टिव्हल सुरू करणार आहे. इथे घर खरेदीदार योग्य दाम आणि ऑफर्स घेऊन घर खरेदी करू शकतात. हे मॉडेल ऑनलाइन असल्यामुळे बिल्डर्सना पूर्ण विश्वासार्हता जपूनच ग्राहकांशी व्यवहार करावे लागतील. यामुळे या नव्या सुविधेवर लोकांचा भरवसा असेल. घरखरेदी करताना लक्षात घ्या या गोष्टी बिल्डरची विश्वासार्हता घर खरेदी करताना सर्वात आधी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची तर ती म्हणजे बिल्डरची विश्वासार्हता. बिल्डरच्या जुन्या रेकॉर्डवर नजर टाकणं आवश्यक आहे. तसेच त्याची आर्थिक स्थिती चांगली आहे की नाही याची चौकशी करणंही आवश्यक आहे. यातून बिल्डर तुम्हाला वेळेत घर देऊ शकेल की नाही हे कळतं. अनेकदा गृहप्रकल्पांना विलंब झाल्यांचे आपण वाचतो. त्यामुळे तुम्ही ज्या इमारतीत घर घेत आहात त्या इमारतीच्या बिल्डरची योग्य चौकशी करणं आवश्यक आहे. (हेही वाचा : खूशखबर! सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या किंमतींमध्ये घट, चांदीही स्वस्त) मान्यता आणि लायसन्स तुम्ही ज्या परिसरात घर घेताय ते घर अधिकृत ठिकाणी बांधण्यात आलं आहे की नाही याची चौकशी करणंही आवश्यक आहे. प्रशासनाने इमारत बांधणीला परवानगी दिली आहे की नाही याची माहिती असणं फार आवश्यक आहे. बिल्डरकडे प्रोजेक्ट संदर्भातील टायटल डीड, रिलीज सर्टिफिकेट, प्रॉपर्टी टॅक्स रिसिटी आणि फायर अप्रुवल असणं आवश्यक आहे. ही कागदपत्र फार आवश्यक आहेत. यासोबतच जमिनीच्या वापरासाठी रेरा सर्टिफिकेट बिल्डरकडे आहे की नाही ते पडताळलं पाहिजे. ==========================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Housing, Money

    पुढील बातम्या