जाहिरात
मराठी बातम्या / मनी / जनधन खातेधारकांसाठी खुशखबर! बॅलेन्स नसतानाही मिळेल 10 हजारांचा फायदा, कसं?

जनधन खातेधारकांसाठी खुशखबर! बॅलेन्स नसतानाही मिळेल 10 हजारांचा फायदा, कसं?

जनधन खातेधारकांसाठी खुशखबर! बॅलेन्स नसतानाही मिळेल 10 हजारांचा फायदा, कसं?

जन धन योजनेंतर्गत, तुमच्या खात्यात शिल्लक नसली तरीही, 10,000 रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध आहे. ही सुविधा अल्प मुदतीच्या कर्जासारखी आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 डिसेंबर : जर तुमचेही जन धन खाते (Jandhan Account) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. जन धन योजना खात्यात अनेक सुविधाही उपलब्ध आहेत. केंद्र सरकार प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY-Pradhanmantri Jan Dhan Yojna) अंतर्गत शून्य शिल्लक बचत खाते उघडते. यामध्ये अपघात विमा, ओव्हरड्राफ्ट सुविधा, चेकबुकसह इतर अनेक फायदेही मिळतात. 10 हजार रुपये कसे मिळवायचे जाणून घ्या? जन धन योजनेंतर्गत, तुमच्या खात्यात शिल्लक (Account Balence) नसली तरीही, 10,000 रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा (Overdraft Service) उपलब्ध आहे. ही सुविधा अल्प मुदतीच्या कर्जासारखी (Short Term Loan) आहे. पूर्वी ही रक्कम 5 हजार रुपये होती. सरकारने ती आता 10 हजारांपर्यंत वाढवली आहे. डेबिट-क्रेडिट कार्ड वापरण्याची पद्धत 1 जानेवारीपासून बदलणार, काय आहे RBI चे नवीन नियम? काय आहे नियम? या खात्यातील ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी कमाल वयोमर्यादा 65 वर्षे आहे. ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे जन धन खाते किमान 6 महिने जुने असावे. तसे नसल्यास, फक्त 2,000 रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट उपलब्ध आहे. जन धन खाते म्हणजे काय? प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) हा सर्वात महत्वाकांक्षी आर्थिक कार्यक्रम आहे जो बँकिंग/बचत आणि ठेव खाती, कर्ज, विमा, पेन्शनमध्ये प्रवेश सुनिश्चित करते. हे खाते कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा व्यवसाय प्रतिनिधी (बँक मित्र) आउटलेटवर उघडले जाऊ शकते. पीएमजेडीवाय खाती शून्य शिल्लक ठेवून उघडली जात आहेत. लाख रुपये गुंतवून सुरु करा व्यवसाय; दरमाह होईल बंपर कमाई, सरकारकडूनही मिळते मदत जन धन खाते कसे उघडायचे? प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जास्त खाते उघडले जाते. परंतु, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमचे जन धन खाते खाजगी बँकेत देखील उघडू शकता. तुमचे दुसरे बचत खाते असल्यास तुम्ही ते जन धन खात्यातही बदलू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक, ज्याचे वय 10 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, तो जन धन खाते उघडू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात