मुंबई, 22 जुलै : इन्कम टॅक्स विभागाच्या मते, आर्थिक वर्ष 2022-23 आणि असेसमेंट ईयर 2023-24 साठी ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. आयटीआर दाखल करण्याचं काम वेगान सुरु आहे. आतापर्यंत जवळपास तीन कोटी लोकांनी आयटीआर दाखल केला आहे. मात्र आयटीआर भरत असताना टॅक्स बचतीसाठी अनेक लोक बोगस भाडे पावत्या आणि गहकर्ज दाखवून आयटीआर दाखल करत असतात. यासोबतच काही लोक हे राजकीय संस्था किंवा धर्मदाय संस्थांना दान केल्याच्या नावावर पैसे क्लेम करतात. अशा प्रकारे करचुकवेगिरी करणारे अनेक सॅलरीड करदाते आता इन्कम टॅक्स विभागाच्या निशाण्यावर आहेत. खोटे दावे करणाऱ्या अनेक करदात्यांना आता इन्कम टॅक्स विभागाने नोटिसा बजावल्या आहेत.
पूर्वी कर अधिकाऱ्यांची फसवणूक करणे आताच्या तुलनेत सोपं होतं. पण सध्या अनेकांना कर चुकवणे महागात पडू शकते. कारण महसूल विभागाद्वारे वापरल्या जाणार्या सॉफ्टवेअरद्वारे त्यांचे रिटर्न रेड फ्लॅग केले आहेत. इकॉनॉमिक टाइम्सने 22 जुलै रोजी ही माहिती दिली आहे. पुरावे देण्याचे आदेश इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांकडून फसवणूक करणाऱ्या करदात्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. आता त्यांना कर सवलतीचा दावा करण्यासाठी कागदोपत्री पुरावे देण्यास सांगितले आहे. या नोटिसा पगारदार व्यक्तींसाठी कलम 10 (13A) अंतर्गत घरभाडे भत्त्यांतर्गत सूट देण्यासाठी, अधिकृत कर्तव्ये पार पाडण्यासाठी मदतनीस नियुक्त करण्यासाठी कलम 10 (14) अंतर्गत भत्ता; किंवा I-T कायद्याच्या कलम 24 (b) अंतर्गत गृहकर्जावरील व्याजासाठी वजावटीचा दावा करणाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत. अज्ञात स्त्रोतांचा हवाला देत ही माहिती देण्यात आली आहे. ITR भरण्याची डेडलाइन वाढणार का? पाहा सरकारने काय म्हटलं कधी केले जाते पुनर्मूल्यांकन 50 लाखांपेक्षा जास्त कमावणाऱ्या पगारदार व्यक्तींसाठी, एका दशकात पुनर्मूल्यांकन केले जाऊ शकते. तर, 50 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी, आठ वर्षांसाठी पुनर्मूल्यांकन केले जाऊ शकते. सध्याच्या तांत्रिक युगात कॉम्प्यूटर रेकॉर्ड असल्यामुळे आयटी विभागाला राजकीय पक्षांनी किंवा धर्मादाय ट्रस्टने त्यांच्या कर रिटर्नमध्ये नोंदवलेल्या डेटाशी व्यक्तींनी नोंदवलेल्या देणग्या खऱ्या आहेत की नाही हे तपासण्यास मदत होते. ITR: कोणतंच काम करत नाही किंवा हाउस वाइफ आहात? तरीही ITR भरणे गरजेचे, होतात मोठे फायदे कर भरणाऱ्यांना सीएची माहिती देण्याचे आदेश कर आणि नियामक सल्लागार कंपनी असायर कन्सल्टिंगचे व्यवस्थापकीय भागीदार राहुल गर्ग यांनी फायनान्शियल डेलीला सांगितले की, करदातांनी केलेले दावे सत्य आहेत की नाही हे तपासण्यासाठी कर अधिकारी आयटीआर डेटाच्या आधारे बाह्य स्त्रोतांकडून एकत्रित केलेल्या माहितीसह, फाइलर्सच्या पडताळणीसह व्यक्तींचे सर्वसमावेशक प्रोफाइलिंग करत आहेत. एवढंच नाही तर ज्यांनी आयटीआर तयार केले आणि दाखल केले आहेत. अशा चार्टर्ड अकाउंटंट, अॅडव्होकेट किंवा आयटी व्यावसायिकांचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक उघड कसा असं आयटी विभागाने करदात्यांना सांगितलं आहे. तंत्रज्ञानाचा होतोय योग्य वापर करचोरी शोधण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर होत आहेत. कमी पगाराच्या करदात्यांना वाटतं की, लहान मूल्य असणाऱ्या प्रकरणाकडे कोण लक्ष देणार? म्हणूनच ते प्रत्यक्ष पेमेंट न करताच अनेक क्लेम करत असतात. मात्र आता तंत्रज्ञानाचा योग्य वापर होतोय.