जाहिरात
मराठी बातम्या / मनी / एकापेक्षा अधिक बँक अकाउंट्स असणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञांना सल्ला

एकापेक्षा अधिक बँक अकाउंट्स असणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञांना सल्ला

एकापेक्षा अधिक बँक अकाउंट्स असणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञांना सल्ला

एकापेक्षा अधिक बँक अकाउंट्स असणे खरचं फायद्याचं आहे की नाही, हा प्रश्न बऱ्याचदा उपस्थित केला जातो. या क्षेत्रातले तज्ज्ञ मात्र होकारार्थी आणि नकारार्थी अशी दोन्ही उत्तरं देतात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 9 सप्टेंबर : सध्याच्या घडीला बँकेत खातं (Bank Account) असणं फार गरजेचं आहे. सरकारी योजनांचा निधीही (Government Schemes Money) आता थेट बँक अकाउंटमध्येच जमा होतोय. बँक अकाउंट उघडण्याची प्रक्रिया सहज आणि सोपी असल्याने अनेकांची एकापेक्षा अधिक बँक अकाउंट्स असल्याचं पाहायला मिळतं; पण असं करणं खरचं फायद्याचं आहे की नाही, हा प्रश्न बऱ्याचदा उपस्थित केला जातो. या क्षेत्रातले तज्ज्ञ मात्र होकारार्थी आणि नकारार्थी अशी दोन्ही उत्तरं देतात. काही तज्ज्ञांच्या मते, सद्यस्थितीत एकच बचत खातं (Savings Account) असणं शहाणपणाचं लक्षण नाही; मात्र एका व्यक्तीची तीनपेक्षा अधिक बँक अकाउंट्स असू नयेत असं वेल्थ क्रिएटर्स फायनान्शियल अ‍ॅडव्हायझरचे को-फाउंडर (Wealth Financial Advisor Co-Founder) विनित अय्यर सांगतात. तीन बँक अकाउंट्स असण्याचे काही फायदे आहेत. ते इथं समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.

    नोकरी सोडल्यानंतर किंवा बदलल्यानंतर PF चे पैसे काढून घ्यावे का? तुमचं किती नुकसान होऊ शकतं?

    कार्यक्षम वित्त व्यवस्थापन ‘लाइव्ह मिंट’च्या एका रिपोर्टनुसार, एसएजी इन्फोटेकचे एमडी अमित गुप्ता म्हणाले, की एका व्यक्तीला अनेक आर्थिक उद्दिष्टं म्हणजेच फायनान्शियल गोल्स (Financial Goal) गाठायची असतात. यात प्रामुख्याने मुलांचं शिक्षण, इमर्जन्सी फंड आणि महिन्याभराचा खर्च आदींचा समावेश असतो. सर्व आर्थिक उद्दिष्टांसाठी वेगवेगळी अकाउंट्स असतील तर तुम्हाला बचतीवर (Savings) नजर ठेवण्यास आणि आर्थिक उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल योग्य राखण्यास मदत होऊ शकते. आर्थिक संकट ओढवणार नाही वेगवेगळ्या आर्थिक उद्दिष्टांसाठी वेगवेगळी बँक अकाउंट्स असल्याकारणाने तुम्ही मुख्य अकाउंटमधून ठराविक वेळेत दुसऱ्या अकाउंटमध्ये फंड ट्रान्सफर (Fund Transfer) करू शकाल. यातून आवश्यक खर्च केल्यानंतर पैशांची किती बचत होत आहे हेदेखील कळू शकेल. यामुळे खर्च करण्यास सोपं होईल. महत्त्वाचं म्हणजे अत्यावश्यक कामांसाठी पैशांची कमतरता भासणार नाही. Sovereign Gold Bondsवर कसा आणि किती टॅक्स भरावा लागतो? गुंतवणुकीआधी समजून घ्या कॅलक्युलेशन पैसे काढण्याची होईल सोय डेबिट कार्डद्वारे (Debit Card) पैसे काढण्याची मर्यादा निश्चित असते. अनेकदा तातडीने अतिरिक्त पैशांची गरज पडू शकते. एकापेक्षा अधिक अकाउंट्स असतील तर तुमच्याकडे कार्ड्सही जास्त असतील आणि याचा फायदा घेऊनन तुम्ही गरज असेल तेवढे पैसे काढू शकता. पैसे सुरक्षित राहतील चार्टर्ड अकाउटंट (Chartered Accountant) राजेंद्र वधवा म्हणाले, की बँक दिवाळखोरीत (Bankrupt) गेल्यास प्रत्येक खातेदाराला (Account Holder) सरकार 5 लाख रुपये देते. एकापेक्षा अधिक सेव्हिंग अकाउंट्स असतील, तर धोका कमी राहतो. दरम्यान, आर्थिक व्यवस्थापन करताना प्रत्येक गोष्टीची आवश्यक ती काळजी घ्यायला हवी. आपण कमावत असलेल्या पैशांचं नियोजन योग्य पद्धतीने होत आहे की नाही हे समजण्यासाठी तीन बँक खाती असतील तर त्याचा फायदा होत असल्याचं तज्ज्ञांना वाटतं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात