मराठी बातम्या /बातम्या /मनी /

नोकरी सोडल्यानंतर किंवा बदलल्यानंतर PF चे पैसे काढून घ्यावे का? तुमचं किती नुकसान होऊ शकतं?

नोकरी सोडल्यानंतर किंवा बदलल्यानंतर PF चे पैसे काढून घ्यावे का? तुमचं किती नुकसान होऊ शकतं?

तुम्ही तुमची नोकरी सोडल्यानंतरही पीएफवर व्याज मिळत राहते आणि पीएफचे व्याज तुमच्या एफडी आणि इतर सर्व ठेव योजनांपेक्षा जास्त असते.

तुम्ही तुमची नोकरी सोडल्यानंतरही पीएफवर व्याज मिळत राहते आणि पीएफचे व्याज तुमच्या एफडी आणि इतर सर्व ठेव योजनांपेक्षा जास्त असते.

तुम्ही तुमची नोकरी सोडल्यानंतरही पीएफवर व्याज मिळत राहते आणि पीएफचे व्याज तुमच्या एफडी आणि इतर सर्व ठेव योजनांपेक्षा जास्त असते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 9 सप्टेंबर : नोकरी गमावल्यानंतर किंवा नोकरी बदलल्यानंतर अनेकजण पीएफ खात्यातून पूर्ण पैसे काढतात. पण खऱ्या अर्थाने हा योग्य निर्णय नाही. यामुळे तुमची बचतीची रक्कम तर खर्च होतेच, पण तुमचे अनेक प्रकारे नुकसानही होते. जर तुम्हाला खूप पैशांची गरज असेल, तर तुमची गरज इतर मार्गाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, परंतु पीएफचे पैसे काढणे टाळा.

पीएफमधून पैसे काढल्याने काय नुकसान होते?

तुम्ही तुमची नोकरी सोडल्यानंतरही पीएफवर व्याज मिळत राहते आणि पीएफचे व्याज तुमच्या एफडी आणि इतर सर्व ठेव योजनांपेक्षा जास्त असते. अशा प्रकारे तुमचे पैसे वाढतच राहतात. याशिवाय पीएफचे पैसे काढले तर पेन्शन योजनेचे सातत्यही संपते. त्यामुळे, नवीन नोकरी मिळवताना, जुन्या कंपनीची संपूर्ण पीएफ रक्कम नवीन कंपनीकडे ट्रान्सफर करणे कधीही चांगले आहे. त्यामुळे सेवा चालू आहे असं मानलं जातं. त्यामुळे पेन्शन योजनेत कोणताही अडथळा येत नाही.

Sovereign Gold Bondsवर कसा आणि किती टॅक्स भरावा लागतो? गुंतवणुकीआधी समजून घ्या कॅलक्युलेशन

निवृत्तीनंतर 3 वर्षांसाठी व्याज मिळते

निवृत्तीनंतरही तुम्ही पीएफचे पैसे लगेच काढले नाहीत, तर तुम्हाला तीन वर्षांपर्यंत व्याज मिळत राहते. तीन वर्षानंतर ते निष्क्रिय खाते मानले जाते. पीएफची रक्कम करमुक्त असल्यामुळे गुंतवणूक करण्याचा हा एक चांगला पर्याय आहे.

निवृ्त्तीनंतर चांगली पेन्शन हवीय? पाहा PPF आणि NPS पैकी कोणती गुंतवणूक ठरेल फायदेशीर

पीएफमधून पैसे काढण्याचे नियम

>> संपूर्ण पीएफ रक्कम केवळ 58 वर्षे वयाची झाल्यानंतर सेवानिवृत्तीनंतर काढता येते.

>> जर एखादी व्यक्ती दोन महिन्यांपर्यंत बेरोजगार राहिली तर पीएफची संपूर्ण रक्कम काढता येते, तर नोकरी सोडल्यानंतर एक महिन्यानंतर 75 टक्के रक्कम काढता येते.

>> तुम्ही सतत 10 वर्षे किंवा त्याहून कमी काळ काम करूनही पीएफचे पूर्ण पैसे काढू शकता.

>> वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत पीएफचे पैसे काढता येतात.

>> जर तुम्ही 7 वर्षे काम केले असेल, तर तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी 50% पर्यंत पैसे काढू शकता.

>>

प्लॉट खरेदी करण्यासाठी, कोणतीही व्यक्ती त्याच्या पगाराच्या जास्तीत जास्त 24 पट पीएफ पैसे काढू शकते. मात्र यासाठी त्याचा 5 वर्षांपर्यंतचा नोकरीचा अनुभव आवश्यक आहे.

>> तुमचे वय 54 वर्षे असल्यास, तुम्ही एकूण पीएफ शिल्लकपैकी 90 टक्के रक्कम काढू शकता.

First published:

Tags: Money, PF Amount