मुंबई, 9 सप्टेंबर : सोन्यात गुंतवणुकीच्या विविध मार्गांपैकी एक म्हणजे सॉव्हरेन गोल्ड बाँड. इतर गुंतवणुकीच्या मार्गांपेक्षा ते अधिक सुरक्षित मानले जाते. त्यावर दरवर्षी 2.5 टक्के व्याजही मिळते. सॉव्हरेन गोल्ड बाँड हे सरकारी बाँड आहेत, जे सरकारच्या वतीने केंद्रीय बँक, RBI द्वारे जारी केले जातात. हे निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे, ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्थांना विकले जातात. सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये किमान एक ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करावी लागते. कोणतीही व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब जास्तीत जास्त 4 किलोपर्यंतचे सोने रोखे खरेदी करू शकतात. ट्रस्ट आणि तत्सम घटकांसाठी कमाल खरेदी मर्यादा 20 किलो आहे. Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? तज्ज्ञांकडून समजून घ्या दरकपातीला कोणते घटक ठरतील कारणीभूत टॅक्स कॅलक्युलेशन सॉव्हरेन गोल्ड बाँड (SGB) वर दरवर्षी गुंतवणूकदारांना निश्चित व्याज मिळते. त्याचा दर वार्षिक 2.5 टक्के निश्चित करण्यात आला आहे. हे व्याज आयकर कायदा, 1961 अंतर्गत करपात्र आहे. एका आर्थिक वर्षात गोल्ड बॉण्ड्समधून मिळालेले व्याज इतर स्त्रोतांकडून मिळालेल्या करदात्याच्या उत्पन्नामध्ये गणले जाते. त्यामुळे करदात्याला कोणत्या आयकर स्लॅबमध्ये येते त्यानुसार कर आकारला जातो. मात्र गोल्ड बाँड्समधून मिळणाऱ्या व्याजावर कोणताही टीडीएस नाही. मॅच्युरिटी कालावधी 8 वर्षे सॉव्हरेन गोल्ड बाँडचा मॅच्युरिटी कालावधी 8 वर्षांचा असतो. 8 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ग्राहकाला मिळणारा परतावा पूर्णपणे करमुक्त असतो. हे बाँड अधिक आकर्षक बनवण्यासाठी आणि अधिकाधिक गुंतवणूकदारांना सोन्याच्या दागिन्यांकडून गैर-भौतिक सोन्याकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सुरू केले आहे. सॉव्हरेन गोल्ड बाँडमधून आधीच बाहेर पडण्याचे दोन मार्ग आहेत. असे केल्याने बाँड रिटर्नवर विविध कर दर लागू होतात. निवृ्त्तीनंतर चांगली पेन्शन हवीय? पाहा PPF आणि NPS पैकी कोणती गुंतवणूक ठरेल फायदेशीर दीर्घकालीन कॅपिटल गेन टॅक्स सॉव्हरेन गोल्ड बाँडचा लॉक-इन कालावधी साधारणपणे 5 वर्षांचा असतो. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आणि मुदतपूर्तीचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी सॉव्हरेन गोल्ड बाँडच्या विक्रीतून मिळणारा परतावा दीर्घकालीन भांडवली नफ्यात ठेवला जातो. अतिरिक्त उपकर आणि इंडेक्सेशन लाभांसह दीर्घकालीन भांडवली नफा कर दर 20 टक्के आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.