जाहिरात
मराठी बातम्या / मनी / IRCTC: व्हिएतनाम आणि कंबोडियाची सैर करायचीये? 'हे' आहे 9 दिवसांच खास टूर पॅकेज

IRCTC: व्हिएतनाम आणि कंबोडियाची सैर करायचीये? 'हे' आहे 9 दिवसांच खास टूर पॅकेज

व्हिएतनाम आणि कंबोडिया आयआरसीटीसी टूर पॅकेज

व्हिएतनाम आणि कंबोडिया आयआरसीटीसी टूर पॅकेज

IRCTC चं हे टूर पॅकेज 9 दिवसांचं आहे. या टूर पॅकेजमध्ये पर्यटक 8 रात्री आणि 9 दिवस व्हिएतनाम आणि कंबोडियाला भेट देणार आहेत. या टूर पॅकेजमध्ये पर्यटक कंबोडिया, हनोई, हा लॉन्ग बे क्रूझ, हो ची मिन सिटी आणि अंगोर वाट या ठिकाणी भेट देतील.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

IRCTC Vietnam and Cambodia Tour Package: आयआरसीटीसी टूरिस्टसाठी विविध टूर पॅकेज सादर करत असते. या टूर पॅकेजच्या माध्यमातून टूरिस्ट देश विदेशांची सैर करतात. आता आयआरसीटीसीने तुमच्यासाठी व्हिएतनाम आणि कंबोडियाचा टूर पॅकेज आणलं आहे. या स्वस्त टूर पॅकेजच्या माध्यमातून तुम्ही व्हिएतनाम आणि कंबोडियाच्या टूरिस्ट डेस्टिनेशंसची सैर करु शकता. चला तर मग या टूर पॅकेजविषयी सविस्तर जाणून घेऊया.

News18लोकमत
News18लोकमत

IRCTC चे हे टूर पॅकेज 9 दिवसांचे आहे IRCTC चे हे टूर पॅकेज 9 दिवसांचे आहे. या टूर पॅकेजमध्ये पर्यटक 8 रात्री आणि 9 दिवस व्हिएतनाम आणि कंबोडियाची सैर करणार आहेत. या टूर पॅकेजमध्ये पर्यटक कंबोडिया, हनोई, हा लॉन्ग बे क्रूझ, हो ची मिन सिटी आणि अंगोर वाट या ठिकाणी भेट देतील. या IRCTC टूर पॅकेजचे नाव VIETNAM WAVES WITH COMBODIA EX-KOLKATA (EHO036A) आहे. आयआरसीटीसीच्या इतर टूर पॅकेजप्रमाणे या टूर पॅकेजमध्येही रेल्वे पर्यटकांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करेल. LIC ची जबरदस्त स्किम, फक्त एकदा करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा पेन्शन! हे टूर पॅकेज कधी सुरू होतेय? IRCTC चे हे टूर पॅकेज 31 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत, या टूर पॅकेजच्या प्रवासासाठी तुम्ही आतापासूनच प्लान करू शकता. हे टूर पॅकेज बुक करण्यासाठी आणि त्याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. तसेच, तुम्ही 8595904072, 8595938067 नंबरवर कॉल करून हे टूर पॅकेज बुक करू शकता. Savings Accounts वर भरमसाठ व्याज देतात या बँक, 8 टक्क्यांपर्यंत मिळेल इंटरेस्ट या टूर पॅकेजचे भाडे या टूर पॅकेजमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 177800 रुपये भाडे द्यावे लागेल. तर, या टूर पॅकेजमध्ये तुम्ही दोन लोकांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 150000 रुपये भाडे द्यावे लागेल. या टूर पॅकेजमध्ये तुम्ही तीन लोकांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती रु.150000 भाडे द्यावे लागेल. जर तुम्ही या टूर पॅकेजमध्ये मुलांसोबत बेडच्या सुविधेसह प्रवास करत असाल तर तुम्हाला 140000 रुपये भाडे द्यावे लागेल. दुसरीकडे, बेड नसलेल्या मुलांचे भाडे 133000 रुपये आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IRCTC , Money18
  • First Published :
जाहिरात
जाहिरात