नवी दिल्ली, 29 जुलै: जर तुम्हाला हिंडण्या-फिरण्याची हौस असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आयआरसीटीसीने (IRCTC) व्हॉलर्ससाठी (Vlogers) एक स्पर्धा आयोजित केली असून त्या स्पर्धेच्या विजेत्यांना 1 लाख रुपयांपर्यंतचं बक्षीस मिळणार आहे. या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर एक मिनिटाचा एक व्हिडीओ करून आयआरसीटीसीला पाठवायचा आहे त्याची अंतिम तारीख आहे 31 ऑगस्ट 2021 आयआरटीसीने CoRover च्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली आहे.
IRCTC नी ट्वीट करून याबद्दलची बातमी दिली आहे. IRCTC नी ऑफिशियल ट्विटर हँडलवर (IRCTC Official Handle) लिहिलंय की या स्पर्धेत भाग घेतलेल्यांना भारतीय रेल्वे आणि त्यांच्या सेवा आणि उत्पादनं याबद्दल असलेल्या विषयांवर व्हिडीओ तयार करायचे आहेत. ते टिकिटिंग, केटरिंग, टूरिझम, एअर, चॅटबोट आणि पर्यटन स्थळं या विषयांवर व्हिडीओ तयार करू शकतात.
कसा करायचा अर्ज?
पुढे दिलेल्या लिंकवर लॉग इन करून तुम्हाला आयआरसीटीसीच्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज भरावा लागेल https://corover.ai/vlog/
विजेत्यांना काय मिळेल बक्षीस?
ही स्पर्धा जिंकणाऱ्याला 1 लाख रुपये रोख, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी दिली जाईल. दुसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धकाला 50 हजार रुपये रोख, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी दिली जाईल. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या स्पर्धकाला 25 हजार रुपये रोख, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी दिली जाईल. या व्यतिरिक्त इतर कॅटेगरीतील विजेत्यांना 500 रुपयांचं गिफ्ट कार्ड आणि सर्टिफिकेट दिलं जाणार आहे.
हे वाचा-Gold: सोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, 1000 रुपयांपेक्षा अधिक दराने उतरली चांदी
300 विजेत्यांची होणार निवड
या स्पर्धेत सुमारे 300 विजेत्यांची नावं जाहीर केली जाणार आहेत. देशातल्या सगळ्या राज्यांतील लोक या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. व्हिडीओचा दर्जा आणि कंटेंटचा दर्जा पाहून विजेत्याची निवड केली जाईल असं आयआरसीटीसीने जाहीर केलं आहे.
IRCTC चे असणार कॉपीराइट
IRCTC CoRover यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठीचे व्हिडीओ IRCTC आणि महाराजा व्हिडीओज या वेबसाईटवर अपलोड करावे लागतील. हे व्हिडीओ वेबसाइटवर अपलोड झाल्यानंतर त्यांचा कॉपीराइट आयआरसीटीसीकडे असेल. त्या व्हिडीओत तो तयार करणाऱ्याचं नाव दिलं जाईल पण तयार करणारी व्यक्ती हा व्हिडीओ त्याचा असल्याचा दावा करू शकणार नाही.
हे वाचा-5 वर्षात 3 लाखांचे झाले 11 लाख, तुम्ही देखील 100 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक
या विषयांवर तयार करा व्हिडीओ
IRCTC टूरिझम, IRCTC Air, IRCTC iMudra अॅप आणि वेबसाइट, IRCTC E-केटरिंग, IRCTC SBI Card, IRCTC ची नवी e-टिकिटिंग वेबसाइट, IRCTC बस बुकिंग, IRCTC तेजस ट्रेन, IRCTC वरून रिटायरिंग रूमचं बुकिंग या विषयांवर स्पर्धक व्हिडीओ तयार करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business News, IRCTC, Money