इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आणली DakPayची सुविधा, घरबसल्या करता येतील महत्त्वाची कामं

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आणली DakPayची सुविधा, घरबसल्या करता येतील महत्त्वाची कामं

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने (India Post Payment Bank) आणि डाक विभागाने ग्राहकांच्या सुविधेसाठी डाकपे अ‍ॅप (DakPay App) लाँच केले आहे. हे अ‍ॅप देखील गुगलपे सारखं काम करतं

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जानेवारी: इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने  (India Post Payment Bank) आणि डाक विभागाने ग्राहकांच्या सुविधेसाठी डाकपे अ‍ॅप  (DakPay App) लाँच केले आहे. हे अ‍ॅप देखील गुगल पे (Google Pay) सारखं काम करतं. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्याच बँकिंग आणि पोस्ट ऑफिस सुविधांचा लाभ घेऊ शकता. पोस्टात खाते नसलं तरी देखील तुम्ही या App चा वापर करू शकता. हे अ‍ॅप यूपीआय (UPI) ट्रान्झॅक्शनशी जोडले गेले असल्याने तुम्ही अगदी सुलभरित्या डिजिटल ट्रान्झॅक्शन करू शकता.

या सुविधांचा मिळेल फायदा

या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही  Domestic Money Transfers अर्थात DMT च्या माध्यमातून पैसे पाठवू शकता. याशियाव गुगल पे प्रमाणे क्यूआर कोड वापरूनही पैसे पाठवू शकता. व्हर्च्यूअल डेबिट कार्ड आणि यूपीआयच्या माध्यमातून कोणतंही सर्व्हिस किंवा व्यापारिक पेमेंट करता येईल. घरबसल्या तुम्हाला आता विविध पेमेंट्स करता येणार आहेत.

(हे वाचा-PNB खातेधारकांसाठी मोठी बातमी!1 फेब्रुवारीपासून या ATMमधून नाही काढता येणार पैसे)

या अ‍ॅपच्या माध्यमातून बँकिंग सर्व्हिस आणि पोस्टल प्रोडक्ट्सचा ऑनलाइन लाभ देखील घेता येईल. ग्राहक विविध आर्थिक सेवांचा फायदा या अ‍ॅपच्या माध्यमातून घेऊ शकतात.

कसा कराल वापर?

-सर्वात आधी प्ले स्टोअरवर जाऊन हे App डाऊनलोड  करा

-यानंतर तुम्हाला तुमचं एक प्रोफाइल बनवावं लागेल

-यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक, नाव, पिन कोड आणि खाते क्रमांक प्रविष्ट करावा लागेल

-त्यानंतर हे अ‍ॅप तुम्हाला बँक खात्याशी लिंक करावं लागेल.

(हे वाचा-पोस्टाच्या या योजनेत सुरक्षित गुंतवणूक, पैसे होतील दामदुप्पट)

-UPI App प्रमाणे या अ‍ॅपमध्ये देखील तुम्हाला 4 अंकी पिन बनवावा लागेल.

-किराणा दुकान ते शॉपिंग मॉल कुठेही तुम्ही हे अ‍ॅप वापरू शकता

ग्रामीण भागात राहणाऱ्यांसाठी हे अ‍ॅप खास

या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही कोणत्याही खात्यातून पैसे IPPB खात्यामध्ये पाठवू शकता. हे अ‍ॅप विकसीत आणि विकासापासून दूर असणाऱ्यांमधील अंतर दूर करण्यासाठी बनवण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून गावामध्ये राहणाऱ्या लोकांना देखील बँकिंग सुविधांचा फायदा मिळेल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 20, 2021, 7:42 AM IST

ताज्या बातम्या