PNB खातेधारकांसाठी मोठी बातमी! 1 फेब्रुवारीपासून या ATM मधून नाही काढता येणार पैसे

PNB खातेधारकांसाठी मोठी बातमी! 1 फेब्रुवारीपासून या ATM मधून नाही काढता येणार पैसे

तुमचे देखील पंजाब नॅशनल बँकेमध्ये खाते असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 1 फेब्रुवारीपासून पीएनबी ग्राहक नॉन-ईएमव्ही एटीएम मशीन्समधून ट्रान्झॅक्शन करू शकत नाहीत.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 जानेवारी: देशामध्ये वाढलेल्या बँकिंग फसवणुकीला रोखण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने मोठं पाऊल उचललं आहे. तुमचे देखील पंजाब नॅशनल बँकेमध्ये खाते असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 1 फेब्रुवारीपासून पीएनबी ग्राहक नॉन-ईएमव्ही एटीएम एटीएम मशीन्समधून (Non-EMV ATM) ट्रान्झॅक्शन करू शकत नाहीत. अर्थात या नॉन-ईएमव्ही मशीन्समधून कॅश काढू शकत नाहीत. PNB ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली आहे.

पंजाब नॅशनल बँकेने केलं ट्वीट

पंजाब नॅशनल बँकेने ट्वीट करून अशी माहिती दिली आहे की, फसवणुकीपासून वाचण्यासाठी ग्राहकांना पीएनबी नॉन ईएमव्ही एटीएम मशीन्समधून 01.02.2021 पासून व्यवहार (वित्तिय किंवा गैर-वित्तिय) करण्यापासून प्रतिबंधत केलं जाईल. गो डिजिटल.. गो सेफ!

Non-EMV ATM म्हणजे काय?

नॉन ईएमव्ही एटीएम म्हणजे ज्यामध्ये व्यवहारावेळी कार्ड ठेवले जात नाही. यामध्ये मॅग्नेटिक स्ट्रीपच्या माध्यमातून डेटा रीड केला जातो. ईएमव्ही एटीएम मशिन्समध्ये कार्ड काही काही सेकंड्ससाठी लॉक होतं.

अलीकडेच दिली आहे ही सुविधा

अलीकडेच पंजाब नॅशनल बँकेने त्यांच्या ग्राहकांना PNBOne अॅपच्या माध्यमातून एटीएम डेबिट कार्डला ऑन-ऑफ करण्याची सुविधा दिली आहे. तुम्ही कार्ड वापरत नसाल तर 'ऑफ' करू शकतात. अशावेळी तुमचे बँक खाते सुरक्षित राहू शकते.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 19, 2021, 9:25 AM IST

ताज्या बातम्या