मराठी बातम्या /बातम्या /मनी /

EPF Update: खात्यात व्याजाचे पैसे अजूनही नाही झाले क्रेडिट? चिंतेचं कारण नाही, वाचा कधीपर्यंत होईल हे काम

EPF Update: खात्यात व्याजाचे पैसे अजूनही नाही झाले क्रेडिट? चिंतेचं कारण नाही, वाचा कधीपर्यंत होईल हे काम

जर तुम्ही ईपीएफओ (EPFO Update) सदस्य असाल आणि अद्याप तुम्हाला पीएफच्या रकमेवरील व्याज मिळाले नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर: जर तुम्ही ईपीएफओ (EPFO Update) सदस्य असाल आणि अद्याप तुम्हाला पीएफच्या रकमेवरील व्याज मिळाले नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employee Provident Fund Organization News Update) म्हणजेच ईपीएफओने गेल्या आर्थिक वर्षातील व्याज जमा करण्यास सुरुवात केली आहे. हे व्याज देशातील सुमारे 6.5 कोटी ग्राहकांच्या खात्यात जमा केले जात आहे. जर तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम (PF Interest Rate Credit Date) जमा झाली नसेल तर तुम्ही 10 ते 15 दिवस प्रतीक्षा करू शकता.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) नुकतेच व्याज जमा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून, लोकांना त्याच्या व्याज क्रेडिट झाल्याचे मेसेज मिळत आहेत.  ईपीएफओच्या सूत्रांचे म्हणणे आहे की प्रत्येक झोन आणि कार्यालयानुसार खात्यात व्याज जमा केले जात आहे. त्यामुळे वेळ लागत आहे. आतापर्यंत सुमारे 4 कोटी खात्यांमध्ये व्याज जमा झाले आहे. उर्वरित खात्यांमध्येही काही दिवसांत व्याज जमा होईल. ईपीएफ प्रकरणातील तज्ज्ञ चंद्रशेखर परसाई म्हणतात की जर 10-15 दिवसांनंतरही खात्यात व्याज जमा झाले नाही तर तुम्ही तुमच्या नियोक्त्याशी किंवा थेट ईपीएफ कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

हे वाचा-Pension Account : पेन्शन खातं बँकेच्या जवळच्या शाखेत ट्रान्स्फर कसं करायचं?

कोरोनामुळे सदस्यांना करावी लागली प्रतीक्षा

कोरोनाचा परिणाम ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात जमा होणाऱ्या व्याजावर देखील झाला. दरवर्षी मार्च ते फेब्रुवारी दरम्यान जमा होणारे पीएफ रकमेवरील व्याज यावेळी उशिरा जमा होत आहे. मात्र असे असले तरी यातून तुमचे नुकसान होणार नाही. कारण व्याज मोजण्याचा EPFO चा फॉर्म्युला जुनाच आहे. म्हणजेच जरी आता इचक्या उशिरा व्याज जमा केले जात असले तरी ते मार्च 2021 पासूनच क्रेडिट केले मानले जाईल.  EPFO ने आर्थिक वर्ष 2020-21 साठी 8.5 टक्के व्याज जाहीर केले आहे. म्हणजेच, जर तुमच्या खात्यात फेब्रुवारीपर्यंत 1 लाख रुपये असतील तर तुमच्या खात्यात 8500 रुपये जमा होतील.

First published:

Tags: Epfo news, Pf, PF Amount, PF Withdrawal