Home /News /money /

सुकन्या समृद्धी योजना, PPF, पोस्टातील गुंतवणूकदारांचा आर्थिक फायदा होणार; काय आहे कारण?

सुकन्या समृद्धी योजना, PPF, पोस्टातील गुंतवणूकदारांचा आर्थिक फायदा होणार; काय आहे कारण?

गेल्या वर्षभरात सरकारी रोख्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. या कारणास्तव, या रोख्यांशी जोडलेल्या लहान बचत योजनांचे व्याजदरही वाढतील अशी अपेक्षा आहे.

    मुंबई, 30 जून : वाढत्या महागाईच्या काळात अल्पबचत योजनांमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पीपीएफ (PPF), सुकन्या समृद्धीसह (Sukanya Samriddhi Yojna) पोस्ट ऑफिसशी (Post Office) संबंधित छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होणार आहे. कारण गेल्या वर्षभरात सरकारी रोखे उत्पन्न (Bond Yeild) वाढले आहे. याचा फायदा लहान गुंतवणूकदारांना वाढीव व्याजदराच्या रूपात मिळू शकतो. इकोनॉमिक्स टाईम्सने याबाबत वृत्त दिलं आहे. शेअर बाजार घसरल्याने आणि क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) तेजीत असल्याने पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता वाढली आहे. गेल्या वर्षभरात सरकारी रोख्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. या कारणास्तव, या रोख्यांशी जोडलेल्या लहान बचत योजनांचे व्याजदरही वाढतील अशी अपेक्षा आहे. सरकारी रोखे उत्पन्न 140 बेसिस पॉइंट्सने वाढले 2011 मध्ये गोपीनाथ समितीने दिलेल्या फॉर्म्युलानुसार अल्पबचत योजनेत 25 ते 100 बेसिस पॉईंट्सची वाढ अपेक्षित आहे. कारण, गेल्या 12 महिन्यांत, बेंचमार्क 10-वर्षीय बाँड यील्डवरील उत्पन्न 140 बेसिस पॉइंट्सने वाढले आहे. या कालावधीत ते 6.04% वरून 7.46% पर्यंत वाढले आहे. एप्रिल-जून तिमाहीत त्याची सरासरी 7.31% आहे. ITR 2022-23 : तुम्हाला ITR फाईल करताना फॉर्म-1 भरावा लागेल का? जाणून घ्या सविस्तर माहिती सुकन्या योजनेचा व्याजदर 8 टक्क्यांपर्यंत वाढेल गोपीनाथ समितीच्या सूत्रानुसार पीपीएफचा व्याजदर 7.81 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर, सुकन्या समृद्धी योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील व्याजदर 8 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. केंद्र सरकारने छोट्या बचत दरांमध्ये वाढ केल्यास आरबीआयच्या फ्लोटिंग रेट बाँडमधील गुंतवणूकदारांनाही फायदा होईल. फ्लोटिंग रेट बाँड्सचा व्याजदरही वाढेल RBI च्या फ्लोटिंग रेट बाँड्सचा व्याजदर NSC शी जोडलेला आहे. NSC च्या तुलनेत सध्या 35 बेसिस पॉइंट अधिक व्याज मिळत आहे. NSC चा प्रचलित दर 6.8% आहे. त्यामुळे RBI फ्लोटिंग रेट बॉन्ड्सवर 7.15% व्याज मिळते. NSC दर 7.15% पर्यंत वाढवल्यास, या बाँडवरील व्याज दर 7.5% असेल, जो सध्या बँकेच्या मुदत ठेवींपेक्षा जास्त आहे. PM Kisan Yojana: 11 वा हप्ता अद्याप मिळालेला नाही? येथे करा तक्रार, पैसे होतील जमा केंद्र सरकार आज जाहीर करू शकते बाँड यील्डमध्ये वाढ झाल्यानंतर 30 जून रोजी केंद्र सरकार वाढीव व्याजदरांबाबत घोषणा करू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. अशा स्थितीत वाढत्या महागाईच्या प्रभावातून अल्पबचत करणाऱ्या गुंतवणूकदारांना निश्चितच दिलासा मिळेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Central government, Investment, Money

    पुढील बातम्या