• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Gold price today: फेस्टिव्ह सीजननंतर सोने दरात घसरण, पाहा काय आहे आजचा भाव

Gold price today: फेस्टिव्ह सीजननंतर सोने दरात घसरण, पाहा काय आहे आजचा भाव

मल्टी कमॉडिटी एक्सचेंज MCX वर आज डिसेंबर डिलीव्हरी सोन्याच्या दरात 0.25 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर चांदी 0.21 टक्के घसरणीसह ट्रेड करत आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : सणासुदीच्या काळात सोने-चांदी दरात (Gold Silver Price Today) चढ-उतार सुरू होते. अशात सोनं खरेदीचा विचार करत असाल, तर चांगली संधी आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज MCX वर आज डिसेंबर डिलीव्हरी सोन्याच्या दरात 0.25 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर चांदी 0.21 टक्के घसरणीसह ट्रेड करत आहे. 2020 मध्ये याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर होता. आज MCX वर सोन्याचा डिसेंबर वायदे भाव 49,091 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. म्हणेच रेकॉर्ड स्तरावरुन सोनं सध्या जवळपास 7109 रुपये स्वस्त मिळत आहे. काय आहे सोने-चांदी दर (Gold Silver Price) - ऑक्टोबर डिलीव्हरी सोन्याचा भाव आज 0.25 टक्के घसरणीसह 49,091 रुपये प्रति 10 ग्रॅम लेवलवर आहे. आज चांदीच्या दरात आज 0.21 टक्क्यांची घसरण झाली असून आजचा भाव 66,825 रुपये आहे.

    Gold Price: गोल्ड रेटमध्ये विशेष तेजी, 50000 रुपयांपार कधी जाणार सोन्याचे भाव?

    मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
    Published by:Karishma
    First published: