मराठी बातम्या /बातम्या /मनी /Investment Tips: केवळ टॅक्स वाचवण्यासाठी खरेदी करू नका विमा पॉलिसी, होईल मोठं नुकसान

Investment Tips: केवळ टॅक्स वाचवण्यासाठी खरेदी करू नका विमा पॉलिसी, होईल मोठं नुकसान

‘जर तुम्ही पॉलिसी घेतली तर टॅक्समध्ये मोठी बचत होईल,’ असं एजंट सांगतो आणि मग लोक पॉलिसी घेऊन टाकतात. मुळात असं बोलून विमा एजंट एकप्रकारे तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू शकतात. वाचा सविस्तर

‘जर तुम्ही पॉलिसी घेतली तर टॅक्समध्ये मोठी बचत होईल,’ असं एजंट सांगतो आणि मग लोक पॉलिसी घेऊन टाकतात. मुळात असं बोलून विमा एजंट एकप्रकारे तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू शकतात. वाचा सविस्तर

‘जर तुम्ही पॉलिसी घेतली तर टॅक्समध्ये मोठी बचत होईल,’ असं एजंट सांगतो आणि मग लोक पॉलिसी घेऊन टाकतात. मुळात असं बोलून विमा एजंट एकप्रकारे तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू शकतात. वाचा सविस्तर

  नवी दिल्ली, 29 जानेवारी: अनेकदा काही लोकं फक्त कर (Tax Benefits) वाचवण्यासाठी जीवन विमा पॉलिसी (life insurance policy) विकत घेतात. ‘जर तुम्ही पॉलिसी घेतली तर टॅक्समध्ये मोठी बचत होईल,’ असं एजंट सांगतो आणि मग लोक पॉलिसी घेऊन टाकतात. मुळात असं बोलून विमा एजंट एकप्रकारे तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू शकतात, जेणेकरून तुम्ही ती पॉलिसी विकत घ्याल. तुम्हालाही एखाद्या एजंटने असं म्हटलं असेल तर पॉलिसी घेण्यापूर्वी एकदा विचार नक्की करा आणि पॉलिसी घेण्याची घाई करू नका.

  इन्कम टॅक्सच्या (income tax) सेक्शन 80C अंतर्गत, जीवन विमा पॉलिसीच्या प्रीमियमवर (life insurance policy premium) वार्षिक 1.5 लाख रुपयांची सूट मिळते. याचीच मदत घेऊन विमा एजंट तुमच्यावर प्रीमियमचा मोठा बोजा लादतात. त्यामुळे तुम्ही सतर्क असायला हवं आणि टॅक्स वाचवण्यासाठी इतर पर्यायांचा शोध घ्यायला हवा. कारण विमा पॉलिसीशिवाय असे अनेक गुंतवणुकीचे पर्याय आहेत, जे तुम्हाला विमा पॉलिसीपेक्षा जास्त परतावा देतात. विमा पॉलिसींची किंमत (policy price) देखील जास्त आहे, ज्यामुळे त्याचा परतावा 4-5 टक्क्यांपर्यंत मर्यादित आहे.

  हे वाचा-मीन खरेदीसाठीही मिळते लोन, Land Loan बद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या

  जानेवारी-मार्चमध्ये सर्वाधिक दबाव

  जानेवारी-मार्चमध्ये पॉलिसी विकण्यासाठी विमा एजंट्सवर त्यांच्या कंपन्यांचा सर्वाधिक दबाव असतो. करदातेही गुंतवणूक करण्याच्या घाईत विमा पॉलिसी घेऊन टाकतात, बऱ्याचदा तर त्यांना त्याची गरजही नसते. विमा पॉलिसी तुमची जोखीम कव्हर करण्यासाठी आहे. याकडे करबचतीचा पर्याय म्हणून पाहिले जाऊ नये, असं BankBazaar.com चे सीईओ आदिल शेट्टी यांनी सांगितलं.

  विम्यापेक्षा चांगला परतावा मिळवण्यासाठी गुंतवणुकीचे पर्याय

  सरकारने ऑफर केलेल्या अनेक बचत योजना विमा पॉलिसीवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त परतावा देतात. यामध्ये तुम्हाला सेक्शन 80C अंतर्गत इन्कम टॅक्समध्ये सूट मिळते. यामध्ये लोकप्रिय योजना सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6%, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर (public provident fund) 7.1% आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रवर (National Saving Certificate) 6.8% परतावा देण्यात येत आहे. याशिवाय इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) सारख्या म्युच्युअल फंड योजनांवर देखील 1.5 लाखांची कर सूट मिळते आणि 10 टक्क्यांहून अधिक परतावा मिळू शकतो.

  हे वाचा-आयकर भरण्याची शेवटची तारीख काय आहे? उशीर केला तर जेलही होऊ शकते

  त्यामुळे विमा एजंट तुम्हाला करबचतीसाठी विमा पॉलिसी घ्यायला सांगत असेल तर ती घेण्यापूर्वी बाकीच्या पर्यायांचा नक्कीच विचार करा. कारण इतर पर्यायांच्या माध्यमातून तुम्हाला विमा पॉलिसीपेक्षा जास्त चांगले परतावे मिळतील. शिवाय, तुम्ही करबचत देखील करू शकता.

  First published:
  top videos

   Tags: LIC, Money