Home /News /money /

घर खरेदीप्रमाणे जमीन खरेदीसाठीही मिळते लोन, Land Loan बद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या

घर खरेदीप्रमाणे जमीन खरेदीसाठीही मिळते लोन, Land Loan बद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या

गृहकर्जावर, तुम्हाला मालमत्तेच्या 90 टक्के पर्यंत कर्ज मिळू शकते. परंतु जमीन कर्जासाठी कर्जाची रक्कम कमी आहे. जिथे फक्त जमीन खरेदीसाठी कर्ज घ्यायचे असेल, तर मालमत्तेच्या किमतीच्या 70-75 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकते.

    मुंबई, 29 जानेवारी : जर तुम्ही घर किंवा व्यवसायासाठी जमीन खरेदी करणार असाल आणि पुरेसे पैसे नसतील तर अजिबात काळजी करू नका. परवडणाऱ्या दरात जमीन खरेदीसाठी बँका कर्जही (Bank Loan) देतात. गृहकर्ज (Home Loan) आणि जमीन कर्ज या दोन वेगळ्या सुविधा आहेत, याबद्दल माहिती घेऊयात. जर तुम्ही जमीन खरेदी करण्यासाठी जमीन कर्ज (Land Loan) घेण्याचा विचार करत असाल, तर येथे काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला उपयोगी पडू शकतात- जमीन कर्जाबद्दल माहिती भारतातील कोणताही नागरिक जमिनीसाठी कर्ज घेऊ शकतो. गृहकर्जासारख्या जमिनीच्या कर्जावर कोणत्याही प्रकारचा कर लाभ नाही. जमीन कर्ज काही विशिष्ट प्रकारच्या जमिनीसाठीच उपलब्ध आहे. बँका सर्वसाधारणपणे विकास प्राधिकरणाने दिलेल्या जमिनीवर कर्ज देण्यास प्राधान्य देतात. खेडेगावात किंवा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या जमिनीवर जमीन कर्ज सामान्यतः उपलब्ध नसते. ते महानगरपालिका किंवा महानगरपालिका हद्दीत असले पाहिजे आणि जमिनीचे स्पष्ट सीमांकन देखील केले पाहिजे. ITR Filing : आयकर भरण्याची शेवटची तारीख विसरु नका, उशीर केला तर जेलही होऊ शकते शेतजमीन किंवा व्यावसायिक जमीन खरेदीसाठी जमीन कर्ज उपलब्ध नाही. शेतजमीन खरेदी करण्यासाठी काही विशेष कर्जे वापरली जाऊ शकतात परंतु ही कर्जे सहजासहजी मिळत नाहीत. ही कर्जे केवळ अल्पभूधारक शेतकरी किंवा भूमिहीन मजुरांसाठी आहेत. जमिनीचे कर्ज घेताना, जमिनीचा वापर कोणत्या कारणासाठी केला जात आहे, हे खूप महत्त्वाचे आहे. किती जमीन कर्ज घेऊ शकता गृहकर्जावर, तुम्हाला मालमत्तेच्या 90 टक्के पर्यंत कर्ज मिळू शकते. परंतु जमीन कर्जासाठी कर्जाची रक्कम कमी आहे. जिथे फक्त जमीन खरेदीसाठी कर्ज घ्यायचे असेल, तर मालमत्तेच्या किमतीच्या 70-75 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकते. जमीन खरेदीसाठी तसेच बांधकामासाठी कर्ज घ्यायचे असेल, तर अधिक कर्ज मिळते. येत्या 1 फेब्रुवारीपासून काही नियम बदलणार, तुमच्यावर काय परिणाम होणार? चेक करा जमीन कर्जाचे व्याजदर गृहकर्जाचा व्याजदर खूपच कमी आहे. तर, जमिनीची कर्जे जास्त व्याजदराने (Land Loan Interest Rates) उपलब्ध आहेत. जमीन कर्जाची परतफेड करण्यासाठी दिलेला कमाल कालावधी 15 वर्षे आहे. गृहकर्जाच्या बाबतीत, कर्जाची परतफेड करण्याची मुदत 30 वर्षांपर्यंत जाऊ शकते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Bank, Loan

    पुढील बातम्या