नवी दिल्ली, 16 मे : पोस्ट ऑफिस (Post Office) मध्ये गुंतवणूक करण्याला अनेकजण प्राधान्य देतात. यामध्ये फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposite FD)साठी अधिक गुंतवणूक करण्यात येते. पोस्ट ऑफिसमध्ये टाइम डिपॉझिटच्या नावाने ही स्कीम उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुम्ही 1 वर्ष, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी पैसे जमा करू शकता. पोस्टामध्ये गुंतवणूक करण्याचा फायदा असा आहे की याठिकाणी असणाऱ्या एफडीमध्ये बँकेपेक्षा 1 टक्के व्याज अधिक मिळते. एसबीआय (State Bank of India) मध्ये 5 वर्षांच्या एफडीमध्ये पैसे ठेवल्यास 5.7 टक्क्याने व्याज मिळते, पोस्टामध्ये हाच व्याजदर 6.7 टक्के आहे. जर तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा आहे तर जाणून घ्या सविस्तर माहिती. पोस्ट ऑफिसचे नवे व्याजदर पोस्ट ऑफिसच्या एक, दोन आणि तीन वर्षांच्या एफडी योजनेमध्ये (Time deposit) तुम्हाला 5.5 टक्के व्याज मिळेल तर 5 वर्षांच्या एफडीवर 6.7 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. (हे वाचा- प्रत्येक इयत्तेसाठी वेगळं DTH चॅनेल,शालेय शिक्षणासाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा ) जाणून घ्या जर तुम्ही 5 लाखांची रक्कम जमा केली तर 5 वर्षांनी किती रक्कम मिळेल आणि कधीपर्यंत तुम्ही गुंतवलेले पैसे दुप्पट होतील- -जमा रक्कम : 5 लाख -व्याजदर : वार्षिक 6.7 टक्के -मॅच्यूरिटी पीरिअड : 5 साल -मॅच्यूरिटीनंतर मिळणारी एकूण रक्कम : 6,91,500 रुपये -मिळणारे व्याज : 1,91,500 रुपये (हे वाचा- स्पेशल ट्रेनसाठी बुकिंग करण्याच्या नियमात बदल, करावं लागेल हे काम ) 6.7 टक्के वार्षिक व्याजाच्या हिशोबाने जर पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक केली तर पैसे दुप्पट होण्यासाठी 10.74 वर्ष म्हणजेच जवळपास 129 महिने लागतील. तेच एसबीआयमध्ये 5.7 टक्के व्याजाच्या हिशोबाने रक्कम दुप्पट होण्यासाठी साधारण 12.63 वर्ष म्हणजेच 152 महिने जातील. म्हणजेच पोस्ट ऑफिसपेक्षा या सरकारी बँकेत 2 वर्ष अधिक काळासाठी रक्कम ठेवावी लागेल. टाइम डिपॉझिटबाबत अधिक माहिती -कोणतीही व्यक्ती सिंगल अकाउंट काढू शकेल -3 प्रौढ व्यक्ती मिळून जॉइंट अकाउंट काढू शकतील -कमीत कमी एफडी 1000 रुपयांची काढता येईल. जास्तीत जास्त शंभरच्या पटीमध्ये येणारी कोणतीही रक्कम एफडीसाठी ठेवता येईल -नॉमिनेशनची व्यवस्था उपलब्ध -तुमचे खाते एका डाकघरमधून दुसऱ्या शाखेमध्ये ट्रान्सफर करता येईल -प्रीमॅच्यूर विड्रॉल केल्यास पेनल्टी द्यावी लागेल -टाइम डिपॉझिटमध्ये असणाऱ्या जमा रकमेवर इनकम टॅक्स कायदा 1961 च्या सेक्शन 80C अंतर्गत करामध्ये सूट मिळते
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.