प्रत्येक इयत्तेसाठी सुरू करणार वेगळं DTH चॅनेल, शालेय शिक्षणासाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

प्रत्येक इयत्तेसाठी सुरू करणार वेगळं DTH चॅनेल, शालेय शिक्षणासाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार शालेय शिक्षणाच्या प्रगतीसाठी डीटीएच (DTH) वर प्रत्येक इयत्तेसाठी वेगळे चॅनल सुरू करण्यात येणार आहे. स्वयं प्रभा डीटीएच चॅनेल्स असं या योजनेचं नाव आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेज संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी 5 पत्रकार परिषद घेऊन 5 टप्प्यांमध्ये याबाबत माहिती दिली. दरम्यान रविवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी कोणत्या योजना आखण्यात आल्या आहेत, याबाबत माहिती दिली. अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार डीटीएच (DTH) वर प्रत्येक इयत्तेसाठी वेगळे चॅनल सुरू करण्यात येणार आहे. स्वयं प्रभा डीटीएच चॅनेल्स असं या योजनेचं नाव आहे. सध्या असे 3 चॅनेल्स असून त्यामध्ये आणखी 12 चॅनेल्सची भर पडणार आहे. परिणामी शालेय शिक्षण अधिक सुलभ करण्याचा मानस आहे. इंटरनेटची सुविधा नसणाऱ्यांसाठी ही योजना फायद्याची ठरेल असही अर्थमंत्री म्हणाल्या. बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हे चॅनेल तयार करण्यात येणार आहेत.

(हे वाचा-मनरेगासाठी 40हजार कोटींची अर्थमंत्र्यांची घोषणा,प्रवासी मजुरांना गावात मिळेल काम)

चॅनेल्सच्या माध्यमातून ई-कंटेटची निर्मिती करण्यात येईल. त्याचबरोबर पॉडकास्ट आणि कम्यूनिटी रेडिओच्या माध्यमातून शालेय शिक्षण सोपं करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत दिव्यांगासाठी देखील विशेष शिक्षण सामग्री पुरवण्यात येणार आहे. देशातील महत्त्वाच्या 100 विद्यापीठांना ऑनलाइन शिक्षणाची परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या चॅनेल्सवर काही तज्ज्ञांकडून स्काइपच्या माध्यमातून मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. या चॅनेल्सची पोहोच वाढवण्यासाठी व्हिडीओ कंटेट पुरवण्याबाबत टाटा स्काय आणि एअरटेलसारख्या खाजगी डीटीएच ऑपरेटरची मदत घेतली जाणार आहे.

त्याचप्रमाणे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माहिती दिली की, 24 मार्चपासून आजपर्यंत DIKSHA प्लॅटफॉर्म 6 कोटी लोकांपर्यंत पोहोचला आहे. इ-पाठशालामध्ये साधारण 200 नवीन पुस्तकं उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

First published: May 17, 2020, 2:15 PM IST

ताज्या बातम्या