जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Diwali Special : आज मुलीला द्या खास गिफ्ट, वयाच्या 21 व्या वर्षी मिळतील पूर्ण 64 लाख रुपये

Diwali Special : आज मुलीला द्या खास गिफ्ट, वयाच्या 21 व्या वर्षी मिळतील पूर्ण 64 लाख रुपये

Diwali Special : आज मुलीला द्या खास गिफ्ट, वयाच्या 21 व्या वर्षी मिळतील पूर्ण 64 लाख रुपये

तुम्हालाही त्यात गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला सरकारने केलेले बदल माहित असणे आवश्यक आहे.

  • -MIN READ New Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : बहुतांश मध्यमवर्गीय कुटुंबे लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे या दिवाळीत तुम्ही तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत गुंतवणूक करू शकता. सरकारतर्फे मुलींसाठी ही अतिशय खास योजना आहे. तुम्हीही लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. या योजनांचे व्याजदर गुरुवारी तिसऱ्या तिमाहीसाठी (ऑक्टोबर-डिसेंबर) 30 बेसिस पॉईंट्सने म्हणजेच 0.3 टक्के वाढवले ​​आहेत. यापैकी एक म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. तुम्हालाही त्यात गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला सरकारने केलेले बदल माहित असणे आवश्यक आहे. सुकन्या समृद्धी योजना (SSY) : सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची अल्प बचत योजना आहे, जी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. मात्र, सरकारने या योजनेवरील उपलब्ध व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. सध्या, सुकन्या समृद्धी योजनेमध्ये 7.6 टक्के वार्षिक व्याज दिले जात आहे. खाते कुठे उघडणार? सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा व्यावसायिक शाखेच्या अधिकृत शाखेत उघडता येते. वयाच्या 21व्या वर्षी मुली या खात्यातून पैसे काढू शकतात.

News18लोकमत
News18लोकमत

तुम्ही किती गुंतवणूक करू शकता? चालू आर्थिक वर्षात सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत, तुम्ही वार्षिक किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये जमा करू शकता. मुदत संपल्यावर मिळतील तब्बल इतके लाख - सध्याच्या व्याजदरानुसार, जर 1.5 लाख रुपये प्रत्येक आर्थिक वर्षात 15 वर्षांसाठी जमा केले, तर तुमच्याद्वारे जमा केलेली एकूण रक्कम 22,50,000 रुपये असेल आणि त्यावरचे व्याज 41,36,543 रुपये असेल. तसेच हे 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या गुंतवणूकीची मुदत पूर्ण होईल. अशा परिस्थितीत खात्यावर जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळत राहील. 21 वर्षापर्यंत ही रक्कम व्याजासह सुमारे 64 लाख रुपये होईल. तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याज केंद्र सरकार दर तिमाहीत ठरवते. अशा परिस्थितीत, व्याजदर मुदत पूर्ण होईपर्यंत अनेक वेळा बदलू शकतात. हेही वाचा -  सोने की चांदी कोणता म्युच्युअल फंड तुम्हाला देईल जास्त रिटर्न? टॅक्सवर मिळते सूट - सुकन्या योजनेत आतापर्यंत 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ फक्त दोन मुलींच्या खात्यावर उपलब्ध होता. तिसरी मुलगी झाल्यास करात सूट नव्हती. मात्र, आता नियम बदलण्यात आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात