जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Fixed Deposit: 700 दिवसांच्या एफडीवर ‘ही’ बँक देतीये तगडा व्याजदर, वाचा संपूर्ण माहिती

Fixed Deposit: 700 दिवसांच्या एफडीवर ‘ही’ बँक देतीये तगडा व्याजदर, वाचा संपूर्ण माहिती

700 दिवसांच्या एफडीवर ‘ही’ बँक देतीये तगडा व्याजदर, वाचा संपूर्ण माहिती

700 दिवसांच्या एफडीवर ‘ही’ बँक देतीये तगडा व्याजदर, वाचा संपूर्ण माहिती

IDBI Fixed Deposite: IDBI बँक मर्यादित कालावधीसाठी 700 दिवसांच्या मुदत ठेवींवर 7.60 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 डिसेंबर: जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला IDBI बँकेच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे. कारण IDBI बँकेनं आपल्या FD व्याजदरात वाढ केली आहे. IDBI बँक आता 700 दिवसांच्या कालावधीवर चांगलं व्याज देत आहे. बँकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, IDBI बँक रिटेल अमृत महोत्सव ठेवीवर 7..60 टक्के व्याज देत आहे. आयडीबीआय बँकेनं ठेवींवरील व्याजदरात वाढ केली असून आता वाढलेले व्याजदर 26 डिसेंबर 2026 पासून लागू होतील. केवळ मर्यादित कालावधीची ऑफर म्हणून 700 दिवसांसाठी मुदत ठेवींवर 7.60 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. यापूर्वी, बँकेनं 19 डिसेंबरपासून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली होती. बँक सध्या 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर चांगलं व्याजदर देत आहे . हे व्याज सामान्य लोकांसाठी 3.00 टक्के ते 6.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 टक्के ते 7.00 टक्क्यांपर्यंत आहे. हेही वाचा:  Money Tips: बंद झालेलं NPS खातं पुन्हा कसं सुरू करायचं? ज्येष्ठ नागरिकांसाठी, IDBI बँक नमन ज्येष्ठ नागरिक ठेव विशेष रिटेल मुदत ठेव योजना ऑफर करते. या कार्यक्रमाची मागील शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 अशी सेट करण्यात आली होती. तथापि, IDBI बँकेने आता 31 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. सरकारने IDBI बँकेच्या खाजगीकरणासाठी प्राथमिक बोली सादर करण्याची मुदत 7 जानेवारीपर्यंत वाढवली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

आयडीबीआय बँकेत सरकार आणि लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनची (एलआयसी) 94.71 टक्के हिस्सेदारी आहे आणि सरकारी मालकीच्या बँकेतील 60.72 टक्के हिस्सा विकण्याचा विचार आहे. एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) किंवा प्राथमिक बोली सादर करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर होती. यशस्वी बोली लावणाऱ्याला सार्वजनिक शेअरहोल्डिंगपैकी 5.28 टक्के मिळवण्यासाठी खुली ऑफर द्यावी लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात