फक्त 131 रुपये गुंतवून मिळतील 20 लाख; सरकारची ही योजना माहिती आहे का?

11 वर्षात लखपती बनवणारी योजना माहित आहे का?

Sukanya Samriddhi Yojana-SSY: केंद्र सरकारने (मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘सुकन्या समृद्धी योजना’ सुरू केली आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 21 एप्रिल : तुम्ही एका मुलीचे पालक असाल तर नक्कीच तिच्या भविष्यासाठी चांगल्या गुंतवणूक पर्यायाचा (Future Investment Options) विचार करत असाल. मग तुम्ही भविष्यात फायदा देणाऱ्या सुकन्या समृद्धी योजनेची (Sukanya Samriddhi Yojana) माहिती जाणून घ्यायला हवी. या योजनेसाठी मोठ्या बचतीची आवश्यता नाही. दररोज फक्त 131 रुपये वाचवून तुम्ही 11 वर्षात मोठी रक्कम मिळवू शकता. 10 वर्षांपर्यंतच्या मुलीच्या नावे सुकन्या समृद्धी योजना सुरू करता येऊ शकते. मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत तिच्या नावे खात्यात ठराविक रक्कम भरावी लागते. मुलीच्या 21 व्या वर्षी योजना मॅच्युअर होते. पण या योजनेत पैसे गुंतवणं म्हणजे मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत त्यामध्ये पैसे लॉक होतात. 18 वर्षानंतरही केवळ 50 टक्के रक्कम काढली जाऊ शकते. मुली 21 वर्षांची झाल्यावरच सगळी रक्कम काढता येऊ शकते. हे वाचा - मंदीमध्ये कमाईची सुर्वणसंधी, 5 हजार गुंतवून होऊ शकता लखपती! याअंतर्गत खाते उघडल्यापासून केवळ 15 वर्षेच पैसे जमा करावे लागतात त्यानंतर 21 वर्षे वयापर्यंत त्या पैशांवर व्याज दिलं जाईल. सर्वात आधी आपण आपली मुलगी 21 वर्षांची असताना आपल्याला किती रक्कम हवी आहे हे ठरवावं. जितक्या लवकर आपण योजना सुरू कराल तितक्या लवकर ती मॅच्युअर होईल. अर्थात मुलीच्या 21 वर्षांपर्यंत योजना सुरू ठेवल्यास आपल्याला जास्त रक्कम मिळेल. हे वाचा - कोरोना काळात PF चा मोठा आधार; उपचारात गरज पडल्यास सहजपणे असे काढू शकता पैसे समजा तुम्ही 2021ला गुंतवणूक करण्यास प्रारंभ केला आहे. त्या वेळी तुमच्या मुलीचं वय 1 वर्ष आहे. योजनेत तुम्ही दररोज 131 रुपये वाचवले तर महिन्याकाठी एकूण 3,930 रुपये होतील. जर दरमहा 3,930 रुपये जमा केले तर वर्षभरात ते 47,160 रुपये बनतील. जर ही गुंतवणूक फक्त 15 वर्षांसाठी केली तर एकूण गुंतवणूक 7,07,400 रुपये होते. यावर 7.6 टक्के वार्षिक व्याजानुसार तुम्हाला एकूण 12,93,805 रुपये व्याज मिळेल. 2021 ला सुरू केलेली योजना 2042 पर्यंत म्हणजे तुमची मुलगी 21 वर्षांची झाल्यावर परिपक्व होईल, त्यावेळी एकूण मॅच्युरिटी रक्कम 20,01,205 रुपये असेल. अशा प्रकारे तुम्ही आपल्या मुलीचे भविष्य संरक्षित करू शकता.
    Published by:News18 Desk
    First published: