Home /News /money /

मंदीमध्ये कमाईची सुर्वणसंधी, 5 हजार गुंतवून होऊ शकता लखपती!

मंदीमध्ये कमाईची सुर्वणसंधी, 5 हजार गुंतवून होऊ शकता लखपती!

सध्याच्या कोरोना साथीच्या (Corona Pandemic) काळात अर्थव्यवस्था मंदावलेली असताना योग्य ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा प्रत्येक गुंतवणूकदाराला आहे.

    मुंबई, 20 एप्रिल: सध्याच्या कोरोना साथीच्या (Corona Pandemic) काळात अर्थव्यवस्था मंदावलेली असताना योग्य ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा प्रत्येक गुंतवणूकदाराला आहे. सध्याच्या परिस्थितीत असे पर्याय कमी प्रमाणात उपलब्ध होत असून, योग्य वेळी योग्य पर्यायाची निवड करण्यासाठी कसोटी लागत आहे. अशा सगळ्या परिस्थितीत गुंतवणूकदारांसाठी एक चांगली बातमी आहे. म्युच्युअल फंडामध्ये (Mutual Funds) गुंतवणूक करण्यासाठी दोन उत्तम योजना दाखल झाल्या असून, त्यात फक्त 5 हजार रुपये गुंतवून मोठा नफा कमावता येणार आहे. मिराइ अॅसेट (Mirae Asset) या म्युच्युअल फंड कंपनीनं भारतात प्रथमच दोन एनवायएसई फॅंग प्लस फंड (NYSE FANG+) दाखल केले असून, हे दोन्ही फंड 19एप्रिलपासून खुले झाले आहेत. मिराइ अॅसेट एनवायएसई फॅंग प्लस ईटीएफ (NYSE FANG+ ETF) ही पहिली योजना असून, ती ओपन एन्डेड योजना आहे. मिराइ अॅसेट एनवायएसई फॅंग प्लस ईटीएफ फंड ऑफ फंड (NYSE FANG+ ETF Fund of Fund) ही दुसरी योजना आहे. हीदेखील ओपन एन्डेड योजना आहे.मिराइ अॅसेट एनवायएसई फॅंग प्लसई टीएफ फंड ऑफ फंड द्वारे मीराइ अॅसेट एनवायएसई फॅंग प्लस ईटीएफमध्ये गुंतवणूक केली जाते. या दोन्ही योजनांमध्ये फक्त 5हजार रुपयांनी गुंतवणुक सुरू करता येते. 30 एप्रिलपर्यंतच या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे. आघाडीच्या कंपन्यांमध्ये समावेश मिराइ अॅसेट ही म्युच्युअल फंड कंपन्यांमधील आघाडीची कंपनी असून तिनं आपल्या योजनांवर ग्राहकांना नेहमीच घसघशीत परतावा दिला आहे. कंपनीच्या लार्ज कॅप फंडानं गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 57.1 टक्के परतावा देऊन गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. बोस्टन कन्सल्टन्सीच्या (Boston Consultancy) मते, कंपनीनं दाखल केलेल्या एनवायएसई फॅंग प्लस इंडेक्स योजनेमध्ये सामील असणाऱ्या 10 पैकी सात कंपन्यांचा न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवरील 2020 मधील सर्वोत्तम 50कंपन्यांमध्ये समावेश आहे. फंडाचे वैशिष्ट्य: -एनवायएसई फॅंग प्लस इंडेक्स हा तंत्रज्ञान आणि ग्राहक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत असून, यामध्ये सतत व्यवहार होत असलेल्या ग्रोथ स्टॉक्सचा समावेश आहे. -एनवायएसई फॅंग प्लस इंडेक्स भारतीय गुंतवणूकदारांना फेसबुक, अॅमेझॉन, अॅपल, नेटफ्लिक्स,अल्फाबेट (गूगल), टेस्ला, ट्विटर इत्यादी जागतिक कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी देते. फॅंग प्लस मधील कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 7.7ट्रिलियन डॉलरआहे. -या कंपन्या आणि विविध क्षेत्रं दीर्घकालीन मेगा ट्रेंड दर्शवतात. त्यांच्यामध्ये अर्थव्यवस्था, व्यवसाय आणि समाज बदलण्याची शक्ती असते. -फॅंग प्लस इंडेक्समध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना भारतीय रुपयातील घसरणीचा फायदा होईल. मिराइ अॅसेट एनवायएसई फँग प्लस ईटीएफया फंडाचे व्यवस्थापन सिद्धार्थ श्रीवास्तव करणार असून, मिराइ अॅसेट एनवायएसई फॅंग प्लस ईटीएफ(NYSE Fang + ETF)या फंडाचे व्यवस्थापन एकता गाला करणार आहेत. मिराइ अॅसेट एनवायएसई फँग प्लस ईटीएफ फंड ऑफ फंड गुंतवणूकदारांना रेग्युलर आणि ग्रोथ अशा दोन्ही पर्यायांसह उपलब्ध आहे.
    First published:

    Tags: Coronavirus, Covid-19, Investment, Money, Pandemic

    पुढील बातम्या