मराठी बातम्या /बातम्या /मनी /1300 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील 63 लाख रुपये; वाचा काय आहे ही LIC पॉलिसी

1300 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील 63 लाख रुपये; वाचा काय आहे ही LIC पॉलिसी

या पॉलिसीचा फायदा 3 महिन्यांच्या बाळापासून ते 55 वर्षीय व्यक्तीपर्यंत घेता येऊ शकतो.

या पॉलिसीचा फायदा 3 महिन्यांच्या बाळापासून ते 55 वर्षीय व्यक्तीपर्यंत घेता येऊ शकतो.

या पॉलिसीचा फायदा 3 महिन्यांच्या बाळापासून ते 55 वर्षीय व्यक्तीपर्यंत घेता येऊ शकतो.

नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : एलआयसी पॉलिसीमध्ये (LIC policy) गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली पॉलिसी आहे. या पॉलिसीमध्ये केवळ 1302 रुपयांची गुंतवणूक करून 63 लाख रुपये मिळवू शकता. LIC च्या या पॉलिसीचं नाव जीवन उमंग पॉलिसी (LIC Jeevan Umang) आहे. या पॉलिसीचा फायदा 3 महिन्यांच्या बाळापासून ते 55 वर्षीय व्यक्तीपर्यंत घेता येऊ शकतो.

या पॉलिसीअंतर्गत एका महिन्याला 1302 रुपये गुंतवणूक केल्यास, वर्षाला 15,624 रुपये होतात. 15,624 रुपये 30 वर्षासाठी ठेवल्यास एकूण गुंतवणूक 4,68,720 रुपये होतील. 31व्या वर्षी वार्षिक 40000 रुपये रिटर्न मिळेल. जर 100 वर्षापर्यंतच्या रिटर्नची गणना केल्यास, 40000 रुपयांवर 70 वर्ष केल्यास, 28 लाख रुपये होतात. या पॉलिसीमध्ये एकूण फायदा 23,41,060 रुपये होईल. त्याशिवाय ही पॉलिसी 100 वर्षापर्यंत कव्हर देते, त्यामुळे व्यक्तीचं वय 101 झाल्यास त्या व्यक्तीला 62.95 लाख रुपये मिळतील.

काय आहेत या पॉलिसीची वैशिष्ट्ये -

- या योजनेत पॉलिसीधारकाला 100 वर्षांपर्यंत कव्हर मिळतो.

- मॅच्योरिटी किंवा पॉलिसी होल्डरच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना रक्कम दिली जाते.

- 90 दिवसांपासून ते 55 वर्षापर्यंतच्या व्यक्ती यात गुंतवणूक करू शकतात.

- प्रीमियम पेइंग टर्म म्हणजेच पीपीटी 15, 20, 25 आणि 30 वर्षापर्यंत निर्धारित आहे.

- जीवन विम्याचा 8 टक्के रिटर्न आयुष्यभरासाठी प्रत्येक वर्षी

(वाचा - 150 रुपये भरा आणि LIC विम्यातून मिळवा 19 लाख रुपये! मुलांसाठी ठरेल फायदेशीर)

LIC ने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेमध्ये प्रीमियम संपल्यानंतर किंवा पॉलिसीच्या मुदतीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, प्रीमियमच्या शेवटच्या वर्षापासून ते वयाच्या 99 वर्षांपर्यंतचा वार्षिक लाभ आणि कुटुंबियांना एकरकमी रक्कम देण्याची सुविधा आहे.

या पॉलिसीची प्रीमियम रक्कम 25000 किंवा त्याच्या गुणकांमध्ये 15, 20, 25, 30 वर्षाच्या पर्यायांसह उपलब्ध असेल. यात जीवन विमा संरक्षण आयुष्यभरासाठी आहे. कोणताही वेगळा प्रीमियम देण्याची गरज नाही. या पॉलिसीबाबत अधिक माहितीसाठी https://www.licindia.in/Products/Insurance-Plan/LICs-Jeevan-Umang या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Bank, Money, Policy, Policy plans