Home /News /money /

International Yoga Day 2020: योग क्षेत्रातील व्यवसायातून महिन्याला कमवा लाखो रुपये, वाचा सविस्तर

International Yoga Day 2020: योग क्षेत्रातील व्यवसायातून महिन्याला कमवा लाखो रुपये, वाचा सविस्तर

गेल्या काही वर्षांमध्ये योगाभ्यास केवळ शरीर तंदुरूस्त ठेवण्याचे माध्यम राहिले नसून एक इंडस्ट्रीच्या रुपाने समोर येत आहे. आरोग्याशी निगडीत हे क्षेत्र कमाईसाठी एक चांगला पर्याय बनला आहे.

    नवी दिल्ली, 21 जून : आज सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस (Interlnational Yoga Day) आहे. कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन न करता योग दिवस साजरा केला जात आहे. प्रत्येकाने आपापल्या परिवाराबरोबर योग दिवस साजरा करावा असं आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये योगाभ्यास केवळ शरीर तंदुरूस्त ठेवण्याचे माध्यम राहिले नसून एक इंडस्ट्रीच्या रुपाने समोर येत आहे. आरोग्याशी निगडीत हे क्षेत्र कमाईसाठी एक चांगला पर्याय बनला आहे. जर तुम्ही या क्षेत्रातून पैसे कमावू इच्छिता तर त्याकरता तुम्हाला एक ते दीड वर्षांपर्यंत कठोर मेहनत घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही एक चांगली कमाई या क्षेतातून करू शकता. ट्रेनिंग आणि सर्टिफिकेटची आवश्यकता जर तुम्ही योगाभ्यासाच्या माध्यमातून कमाई करू इच्छिता तर त्याआधी काही वर्ष तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. एक-दोन वर्ष तुम्हाला ट्रेनिंग, अभ्यास आणि  सर्टिफिकेशन साठी द्यावे लागेल. (हे वाचा-YOGA DAY 2020 - इथं प्रत्यक्ष प्राण्यांसह केला जातो योगा; VIDEO पाहा) देशामध्ये काही नावाजलेल्या इन्स्टिट्यूट्स आहेत, जे योग प्रशिक्षण देतात. त्यानंतरच तुम्ही यामध्ये तुमचे करिअर बनवू शकता. त्याकरता पुढील काही पर्याय उपलब्ध आहेत. योग शिक्षक बना योगच्या माध्यमातून कमाई करण्याचा महत्त्वाचा पर्याय म्हणजे 'योग शिक्षक' बनणे. तुमची ट्रेनिंग जेवढी चांगली होईल तेवढे चांगले शिक्षक तुम्ही बनू शकता. योग शिकवणे हे असे क्षेत्र आहे की ज्यामध्ये सुरूवातीला काही खास कमाई नसली तरीही अनुभव आणि प्रसिद्धी वाढल्यानंतर योग शिक्षकाची कमाई वाढण्यास मदत होते. सुरू करा फिटनेस सेंटर योग स्टुडिओ आणि फिटनेस सेंटर सध्याच्या आधुनिक काळात एक महत्त्वाचा भाग झाले आहेत. मेट्रो सिटी त्याचप्रमाणे परदेशातही यांसारखे सेंटर्स उघडण्यात आले आहेत. (हे वाचा-कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी योग महत्त्वाचा- मोदी) योग सेंटर सुरू करण्यासाठी तुम्हाला योग प्रशिक्षण देण्याची कला अवगत असणे तर आवश्यकच आहे, पण त्याचबरोबर व्यवस्थापनाचे कौशल्य देखील असणे अनिवार्य आहे. एवढी  होईल कमाई एक योग प्रशिक्षक म्हणून ट्रेनिंग सेंटर उघडल्यास तुम्ही प्रति महिना 20 ते 30 हजार कमावू शकता. जर एखाद्याच्या घरी जाऊन तुम्ही शिकवणार असाल तर त्याचे शूल्क अधिक आकारता येईल. एखाद्या मोठ्या आजाराशी लढणाऱ्या व्यक्तीला योग शिकवण्याचे काम हाती घेतल्यास प्रति महिना 50 ते 60 हजार रुपयांची कमाई होऊ शकते. या क्षेत्रात मुरलेले प्रशिक्षक तर महिन्याला 1-2 लाख रुपये कमावत आहेत. तुम्ही या क्षेत्रात ट्रेनिंग घेऊन दुसऱ्याच्या फिटनेस/योग सेंटरमध्ये देखील काम करू शकता. संपादन - जान्हवी भाटकर
    First published:

    Tags: International Yoga Day, World yoga day, Yoga guru

    पुढील बातम्या