जाहिरात
मराठी बातम्या / देश / कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी योग महत्त्वाचा- मोदी

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी योग महत्त्वाचा- मोदी

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी योग महत्त्वाचा- मोदी

जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस (Intertnational Yoga Day 2020) आणि फादर्स डे (fathers day) साजरा केला जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 जून : जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस (Intertnational Yoga Day 2020) आणि फादर्स डे (fathers day) साजरा केला जात आहे. कोरोना व्हायरसमुळे यंदा पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय योग दिवस हा डिजिटल पद्धतीनं साजरा केला जात आहे. देशभरात कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण टाळण्यासाठी पहिल्यांदाच डिजिटल स्वरुपात साजरा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जगतेला संबोधित केलं आहे. यावेळी त्यांनी कोरोनाला हरवण्यासाठी योग आणि प्राणायाम कसा महत्त्वाचा आहे हे सांगितलं. योग केवळ शारीरिकच नाही तर मानसिक स्वास्थही चांगलं ठेवण्यासाठी मदत करतो. त्यामुळे प्रत्येकानं दिवसातला काही वेळ योग आणि प्राणायाम करायला हवा. योग आणि प्राणायाम करून आपण कोरोनाविरुद्ध लढा देऊ शकतो असंही मोदी म्हणाले आहे. काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी? -कोरोना श्वसनसंस्थेवर हल्ला करतो. त्यामुळे श्वसनाचे व्यायम करणं आरोग्यासाठी आणि कोरोनाला हरवण्यासाठी महत्त्वाचं आहे. -प्राणायम आणि योग आपल्या श्वसनाचे विकार होऊ नये आणि इम्युनिटी वाढावी यासाठी मदत करतात -संयम, सहनशक्ती आणि शांती मिळते -योग अॅट होम योग विथ फॅमेली ही यावेळेची थीम आहे. कोरोनाचं संक्रमण टाळण्यासाठी घऱी राहून योग करा आणि तो आपल्या जीवनाचा हिस्सा बनायला हवा. - योग केल्यानं शरीरात आणि घरात ऊर्जा निर्माण होते. - योग हा केवळ शरीरासाठीच नाही तर मानसिक शांतता आणि स्वास्थ सुधारण्यासाठी महत्त्वाचा आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात