मुंबई, 16 डिसेंबर: देशातील सर्वात मोठ्या बँकेचं म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाचं गृहकर्ज आता महाग झालं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर, जवळपास सर्व बँकांनी कर्जाचे व्याजदर वाढवले आहेत आणि आता, SBI ही व्याजदर वाढवणारी नवीन बँक आहे. कर्जाच्या व्याजदरात वाढ झाल्यामुळे तुमची गृहकर्ज EMI (SBI Home Loan EMI) किती वाढणार आहे ते येथे जाणून घ्या.
SBI च्या गृहकर्जाचे वाढलेले व्याजदर 15 डिसेंबर 2022 पासून लागू झाले आहेत. बँकेने MCLR (MCLR), EBLR (EBLR) आणि RRLR (RRLR) म्हणजेच जवळपास सर्व प्रकारच्या कर्जाचे व्याजदर वाढवले आहेत.
SBI कर्जाचा व्याजदर किती वाढला?
SBI च्या वेबसाइटनुसार, MCLR आधारित वेगवेगळ्या कालावधीच्या कर्जाचे व्याजदर 8 टक्के ते 8.60 टक्के आहेत. पूर्वी तो 7.75 टक्के ते 8.35 टक्के होता. ऑटो, गृह आणि वैयक्तिक कर्ज यांसारखी बँकेची बहुतेक कर्ज व्याजदर यावर आधारित असतात.
हेही वाचा: इलॉन मस्कचा श्रीमंतीचा मुकुट गेला! 73 वर्षीय उद्योगपतीने मिळवली गादी; कोण आहे बर्नार्ड अरनॉल्ट?
गृहकर्ज किती महागलं?
SBI च्या म्हणण्यानुसार, सध्या त्यांच्या गृहकर्जावर किमान व्याजदर 8.90 टक्के आहे. ज्यांचा CIBIL स्कोअर 800 किंवा त्याहून अधिक आहे त्यांच्यासाठी हा व्याजदर आहे. त्याच वेळी, बँक यापेक्षा कमी सिबिल स्कोअर असलेल्यांना वेगवेगळ्या व्याजदरांवर उपलब्ध करून देते.
तुमचा EMI किती वाढेल?
आता जाणून घेऊया की, व्याजदर वाढल्यानंतर तुमच्या होम लोन EMI वर किती पैसे वाढणार आहेत. आपण 20 वर्षांसाठी 35 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे असे समजू या. तुमचा CIBIL स्कोर देखील 800 च्या वर होता. अशा परिस्थितीत बँक तुमच्याकडून 8.55 टक्के व्याज आकारत होती, जो आता 8.90 टक्के होईल.
जुन्या व्याजानुसार, तुमचा ईएमआय 30,485 रुपये असेल तर तो आता आता 31,266 रुपये होईल. म्हणजेच तुमचा ईएमआय दरमहा 781 रुपयांनी वाढेल. म्हणजेच तुम्हाला वर्षभरात 9,372 रुपये अधिक भरावे लागतील.
ग्राहकांसाठी बँक 31 जानेवारी 2023 पर्यंत सणासुदीच्या ऑफर देत आहे. यानंतर व्याजदरात बदल होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Loan, SBI, Sbi home loan