नवी दिल्ली, 19 मार्च : कोविड-19 च्या लसीकरणाबाबत (COVID-19 Vaccination) तुमच्या मनात भीती आहे, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर (Corona Vaccine) जर तुमची प्रकृती खराब झाली तर रुग्णालयात केल्या जाणाऱ्या उपचाराचा खर्च विमा कंपनी उचलेल. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) यांनी यासंदर्भात एक निर्देश जारी केले आहेत. भारतात 18 मार्चपर्यंत 3.08 कोटी लोकांना कोरोना लशीचा पहिला डोज देण्यात आला आहे. (insurance company cover if Patient gets sick after corona vaccination)
IRDAI च्या एका विधानानुसार, जर कोरोनाच्या लसीकरणानंतर जर कोणत्याही रिअॅक्शनमुळे रुग्णालयात भर्ती व्हावं लागलं तर हा खर्च आरोग्य विमा कंपनीद्वारा कव्हर केला जाईल. कोरोनाची लस घेतल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत जर रुग्णालयात भर्ती व्हावं लाहले तर हेल्थ पॉलिसीहोल्डर्सचा खर्च कंपन्या उचलतील. हॉस्पिटेलायजेशन हेल्थ इंश्योरेन्स पॉलिसीअंतर्गत पॉलिसीच्या नियम आणि अटींमध्ये कव्हर आहे.
कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू
कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्च 2021 पासून सुरू झाला आहे. आतापर्यंत 3.07 कोटी लोकांना कोरोनाचा पहिला डोज देण्यात आला आहे. या टप्प्यात 60 वर्षांहून अधिक वयाच्या सर्व नागरिक आणि 45 ते 59 वय असलेल्यांना सामील करण्यात आलं आहे. IRDAI नोटिफिकेशननुसार लसीकरणानंतर रिअॅक्शन आल्यास कोणत्याही रुग्णालयात भरती झाल्यात त्याचा खर्च विमा कंपनी करेल. याला एखाद्या आजाराप्रमाणे हाताळण्यात येईल, आणि विमा कव्हर असेल. (insurance company cover if Patient gets sick after corona vaccination)
हे ही वाचा-...तर पीपीई किट घालून द्यावी लागेल MPSC ची परीक्षा; पर्यवेक्षकांसाठीही नियम
लसीकरणासाठी कसं कराल रजिस्ट्रेशन
CO-WIN या अॅपच्या माध्यमातून तुम्ही नोंदणी करू शकता. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या फोनवप SMS च्या माध्यमातून वेळ दिली जाईल. कोरोना लस घेण्यासाठी ओळखपत्र आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread, Corona updates, Corona vaccination, Covid-19, Insurance, Money, Patient death, Vaccination