...तर पीपीई किट घालून द्यावी लागेल परीक्षा; MPSC च्या परीक्षार्थींसह पर्यवेक्षकांसाठीही नियम

...तर पीपीई किट घालून द्यावी लागेल परीक्षा; MPSC च्या परीक्षार्थींसह पर्यवेक्षकांसाठीही नियम

कोरोनादरम्यान परीक्षांचं आयोजन करण्यात आलं आहे, त्यामुळे अधिक कडक प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत

  • Share this:

वाशिम, 18 मार्च : वाशिम शहरातील 7 उपकेंद्रांवर रविवार 21 मार्च रोजी 2568 विद्यार्थी एमपीएससीची परीक्षा देणार आहे. सकाळी 10 ते 12 आणि दुपारी 3 ते 5 या वेळेत दोन पेपर घेतले जाणार आहे. दरम्यान राज्यावर कोरोनाचं संकट घोंगावत असल्याने अनेकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. सर्व विद्यार्थ्यांना सकाळी 8 वाजता उपकेंद्रांवर आल्यानंतर दुसरा पेपर झाल्यानंतर परीक्षा केंद्राबाहेर जाता येणार आहे. परीक्षेला जाण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांची ऑक्सिमिटर, थर्मल गणने तपासणी केल्यानंतर त्यांना मास्क आणि सॅनिटायझर देण्यात येणार आहे. (then PPE kit will have to be put to the test Rules for Supervisors as well as MPSC Examiners )

ज्या परीक्षार्थीला ताप, सर्दी किंवा इतर कोरोना सदृश्य लक्षण दिसतील त्या विद्यार्थ्यांना पीपीई किट घालून बसविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय या विद्यार्थ्यांना स्वतंत्र खोलीत बसविण्यात येईल. या खोलीतील पर्यवेक्षकांनाही पीपीई किट घालणं बंधनकारक असेल. परीक्षा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या 300 कर्मचारी अधिकाऱ्यांची दोन दिवसांपूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली असून यातील 150 जणांचा अहवाल आज मिळाला आहे.(then PPE kit will have to be put to the test Rules for Supervisors as well as MPSC Examiners )

हे ही वाचा-Covid किट घालून द्यावी लागणार MPSC ची परीक्षा; आयोगाच्या निर्णयानंतर चर्चा

त्यामध्ये एकूण 12 अधिकारी कोरोना बाधित निघाले आहेत. उद्या शुक्रवारी उर्वरित 150 कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल घेण्यात येईल. जे अधिकारी, कर्मचारी कोरोना बाधित निघाले त्यांच्या ऐवजी इतरांची  नियुक्ती करण्यात येणार आहे. सर्व परीक्षा केंद्रांचं निर्जंतुकीकरण आयोगाने नेमलेली खाजगी कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: March 18, 2021, 10:28 PM IST

ताज्या बातम्या