• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • आता मालमत्ता खरेदी करणं अधिक सुरक्षित होणार; फसवणूक टाळण्यासाठी विमा कंपन्या आणणार योजना

आता मालमत्ता खरेदी करणं अधिक सुरक्षित होणार; फसवणूक टाळण्यासाठी विमा कंपन्या आणणार योजना

file photo

file photo

खोटी कागदपत्रं वापरून एकच घर अनेक जणांना विकल्याच्या किंवा परस्पर दुसऱ्याची मालमत्ता विकून फसवणूक केल्याच्या बातम्या अनेकदा आपण ऐकतो. ; मात्र आता या सगळ्या अडचणींवर मात करता येणार आहे.

  • Share this:
नवी दिल्ली 14 सप्टेंबर : खोटी कागदपत्रं वापरून एकच घर अनेक जणांना विकल्याच्या किंवा परस्पर दुसऱ्याची मालमत्ता विकून फसवणूक केल्याच्या बातम्या अनेकदा आपण ऐकतो. अनेकदा मालमत्तेचा (Property) खरा मालक कोण याची माहिती मिळत नाही. अशा वेळी न्यायालय (Court) ती मालमत्ता बेकायदेशीर (illegal) असल्याचं घोषित करतं. व्यवहार करतानाही अडचणी येतात; मात्र आता या सगळ्या अडचणींवर मात करता येणार आहे. कारण लवकरच विमा कंपन्या टायटल इन्शुरन्स (Title Insurance) ही मालमत्ता मालकी हक्काबाबतची पॉलिसी दाखल करणार आहेत. 'टीव्ही नाइन हिंदी'ने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात 'इर्डा'ने (आयआरडीएआय -IRDAI) आरोग्य विमा कंपन्या वगळता इतर विमा कंपन्यांना (Insurance Companies) टायटल इन्शुरन्स योजना उपलब्ध करण्यास सांगितलं आहे. यामुळे मालमत्ता खरेदी करणाऱ्या व्यक्तींची खोट्या कागदपत्रांच्या सहाय्यानं केली जाणारी फसवणूक टाळता येणं शक्य होणार आहे. टायटल इन्शुरन्स योजनेमुळे मालमत्तेच्या मालकी हक्कातल्या घोटाळ्यामुळे होणाऱ्या फसवणुकीपासून ग्राहकांना संरक्षण मिळतं. पती-पत्नीसाठी जबरदस्त आहे ही सरकारी योजना, दर महिन्याला मिळेल 10000 रुपये पेन्शन नुकसानभरपाई विम्याचाच हा एक प्रकार आहे. मालमत्तेच्या मालकी हक्काबाबत चुकीचं नाव असल्यानं किंवा अन्य काही घोटाळ्यामुळे, तसंच चुकीच्या कंपन्या किंवा वैयक्तिक पातळीवर होणाऱ्या आर्थिक नुकसानाची भरपाई देण्याची तरतूद या योजनेत असावी, अशी सूचना 'इर्डा'ने केली आहे. आपल्या देशात अशा प्रकारच्या विमा योजना अत्यंत प्राथमिक अवस्थेत असून, सध्या त्या फक्त विकासक (Developers), बांधकाम व्यावसायिक यांच्यासाठीच उपलब्ध आहेत. सर्वसामान्य नागरिकांना याबाबत फारशी माहितीदेखील नाही. 'इर्डा'ने याला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतल्यानं आता सर्वासामान्य नागरिकांनाही ही विमा योजना उपलब्ध होईल आणि त्याचा प्रसारही वाढेल. Couples ने सेविंग करून 17 महिन्यांत चुकवले 3 कोटींचे कर्ज ‘नॅशनल सायबर सिक्युरिटी एजन्सी सीईआरटी-इन’च्या (कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया-CERT India) मते, सध्या कोरोना काळात घरून काम (Work From Home) करण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगार वैयक्तिक संगणक (Individual Computers) आणि नेटवर्क्सना (Network) लक्ष्य करत आहेत. सगळ्यात अधिक सायबर हल्ले (Cyber Fraud) वैयक्तिक नेटवर्कवर होत आहेत. त्यामुळे 'इर्डा'ने सायबर विम्याबाबत (Cyber Insurance) काही नवीन नियम जारी केले असून, अलीकडेच 8 सप्टेंबर रोजी त्याबाबत एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार आता सायबर विमा योजनेत फंड चोरी, आयडेंटिटी चोरी, अन-ऑथोराइज्ड ऑनलाइन व्यवहार, ईमेल-स्पूफिंग, सोशल मीडिया डेटा चोरी, सायबर स्टॉकिंग, बुलिंग, मालवेअर, फिशिंग कव्हर, मीडिया लायबिलिटी क्लेम, सायबर खंडणी, डेटा आणि गोपनीयता भंग आदी घटनांचा समावेश बंधनकारक करण्यात आला आहे.
First published: