मराठी बातम्या /बातम्या /मनी /पती-पत्नीसाठी जबरदस्त आहे ही सरकारी योजना, दर महिन्याला मिळेल 10000 रुपये पेन्शन

पती-पत्नीसाठी जबरदस्त आहे ही सरकारी योजना, दर महिन्याला मिळेल 10000 रुपये पेन्शन

या योजनेत 18 ते 40 वर्ष वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो आणि पेन्शनचा लाभ घेऊ शकतो.

या योजनेत 18 ते 40 वर्ष वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो आणि पेन्शनचा लाभ घेऊ शकतो.

या योजनेत 18 ते 40 वर्ष वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो आणि पेन्शनचा लाभ घेऊ शकतो.

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : रिटायरमेंट सिक्योर करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करणं महत्त्वाचं ठरतं. यासाठी सरकारची अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana- APY) चांगला पर्याय आहे. या योजनेत पती आणि पत्नी वेगवेगळं अकाउंट ओपन करुन दरमहिना 10000 रुपये पेन्शन मिळवू शकतात.

अटल पेन्शन योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यावेळी असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. परंतु आता या योजनेत 18 ते 40 वर्ष वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो आणि पेन्शनचा लाभ घेऊ शकतो. या योजनेत 60 वर्षानंतर पेन्शन मिळण्यास सुरुवात होते.

अटल पेन्शन योजना ही सरकारी योजना आहे, ज्यात तुमच्याद्वारे गुंतवणूक केली जाणारी रक्कम तुमच्या वयावर अवलंबून असते. या योजनेअंतर्गत तुम्हाला कमीत कमी 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये आणि अधिकतर 5,000 रुपये मासिक पेन्शन मिळतं. ही एक सुरक्षित गुंतवणूक असून यात रजिस्ट्रेशन करण्यासाठी सेव्हिंग अकाउंट, आधार नंबर आणि एक मोबाईल नंबर असणं गरजेचं असतं.

काय आहेत योजनेचे फायदे -

या योजनेअंतर्गत 18 ते 40 वयोगटातील लोक अटल पेन्शन योजनेत आपलं नॉमिनेशन करू शकतात. त्यासाठी अर्जदाराकडे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग अकाउंट असणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीने 18 व्या वर्षी अटल पेन्शन योजना सुरू केल्यास, त्याला 60 वर्षानंतर दर महिन्याला 5000 रुपये मासिक पेन्शन मिळेल. यासाठी दर महिन्याला 210 रुपये जमा करावे लागतील.

केवळ 60 रुपयांत सुरू करा LIC ची ही पॉलिसी, मॅच्युरिटीवर मिळेल संपूर्ण प्रीमियम

39 वर्षाहून कमी वयोगटातील पती-पत्नी या योजनेचा वेगवेगळा लाभही घेऊ शकतात. यात त्यांना 60 वर्षानंतर संयुक्तरित्या दर महिन्याला 10 हजार रुपये पेन्शन मिळेल. जर पती-पत्नीचं वय 30 वर्ष किंवा त्याहून कमी आहे, त्यांना आपापल्या अकाउंटमध्ये दर महिन्याला 577 रुपये भरावे लागतील. जर पती-पत्नीचं वय 35 वर्ष असेल, तर त्यांना दर महिन्याला 902 रुपये आपल्या APY अकाउंटमध्ये टाकावे लागतील.

जर पती-पत्नीपैकी एकाचा मृत्यू झाला, तर जीवित पार्टनरला 8.5 लाख रुपये मिळतील. तसंच दर महिन्याला संपूर्ण पेन्शनही मिळेल. अटल पेन्शन योजनेत गुंतवणुक करणाऱ्या लोकांना इन्कम टॅक्स अॅक्ट 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांचा टॅक्स बेनिफिटही मिळतो.

First published:
top videos