अभिनेते शरद पोंक्षे यांच्या गाडीवर दगडफेक, काचा फोडून हल्लेखोर पसार

अभिनेते शरद पोंक्षे यांच्या गाडीवर दगडफेक, काचा फोडून हल्लेखोर पसार

पत्रकार परिषद सुरु असताना त्यांची कार ज्या ठिकाणी पार्क करण्यात आली होती त्याच ठिकाणी काही तरुणांनी येऊन दगडफेक केली.

  • Share this:

अहमदनगर 09 मार्च :  आपल्या वक्तव्यांनी कायम वादात सापडणारे अभिनेते शरद पोंक्षे यांच्या गाडीवर आज हल्ला करण्यात आला. अहमदनगरमध्ये पोंक्षे आले असताना ही घटना घडली. या हल्ल्याच्या वेळी ते गाडीमध्ये नव्हते. हल्लेखोरांनी गाडीवर दगडफेक केली. यात गाडीच्या काचा फुटल्या. या हल्ल्यात कुणालाही दुखापत झाली नाही. नगरमध्ये 100 वी अखिल भारतीय नाट्य परिषद होणार आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पत्रकार परिषद सुरु असताना त्यांची कार ज्या ठिकाणी पार्क करण्यात आली होती त्याच ठिकाणी काही तरुणांनी येऊन दगडफेक केली अशी माहिती दिली जातेय. पण हा हल्ला कुणी केला याची माहिती द्याप मिळू शकली नाही. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडक यांच्यापेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकरांचं अस्पृश्यता निवारणाचं काम मोठं होतं असं वक्तव्य पोंक्षे यांनी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.

काय म्हणाले होते पोंक्षे?

'अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापेक्षा वीर सावरकरांचं योगदान श्रेष्ठ आहे,' असं वक्तव्य अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलं होतं. त्या वक्तव्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पोंक्षे यांना टार्गेट केलं असून, हा डोक्यावर पडला काय? काय बोलतो त्याचे त्यालाच कळते कि नाही माहित नाही अशी टीका त्यांनी पोंक्षे यांच्यावर केलीय. कट्टर सावरकरवादी असलेल्या पोंक्षे यांच्या वक्तव्यामुळे याआधीही अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.

ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, राज ठाकरेंनी दिला इशारा

फर्ग्युसन कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'मी सावरकर' या वक्तृत्व स्पर्धेवेळी वाद झाला होता. या स्पर्धेच्या समारोपाला आलेल्या अभिनेते शरद पोंक्षे यांना पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या विरोधाचा सामना करावा लागला. त्यामुळे विद्यार्थी संघटनांच्या रोषाला बळी पडावं लागू नये म्हणून शरद पोंक्षे हे गुपचूप दुसऱ्या मार्गाने सभागृहात पोहोचले होते.

आदित्य यांच्यावर वॉच ठेवणार अमित ठाकरे

शरद पोंक्षे हे 'मी सावरकर' या वक्तृत्व स्पर्धेच्या समारोपासाठी फर्ग्युसन कॉलेजमध्ये येणार हे कळताच पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी विरोध सुरू केला. तसंच त्यांच्या आगमनावेळी जोरदार घोषणाबाजीही केली होती. पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या घोषणाबाजीला अभाविपकडूनही घोषणाबाजी करून प्रत्युत्तर देण्यात आलं होतं.

 

 

First published: March 9, 2020, 2:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading