सामान्यांना झटका! महागाई आणखी वाढणार, गेल्या 5 वर्षांतला उच्चांक

सामान्यांना झटका! महागाई आणखी वाढणार, गेल्या 5 वर्षांतला उच्चांक

यावर्षी महागाईच्या मुद्द्यावर सामान्यांना मोठा धक्का बसू शकतो. भाज्यांचे भाव वाढल्यामुळे किरकोळ बाजारातली महागाई वाढण्याची शक्यता आहे. महागाईचा गेल्या 5 वर्षांतला हा उच्चांक असेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 जानेवारी : यावर्षी महागाईच्या मुद्द्यावर सामान्यांना मोठा धक्का बसू शकतो. भाज्यांचे भाव वाढल्यामुळे किरकोळ बाजारातली महागाई वाढण्याची शक्यता आहे. महागाईचा गेल्या 5 वर्षांतला हा उच्चांक असेल.डिसेंबरमध्ये किरकोळ बाजारातली महागाई 6 टक्क्यांपेक्षा जास्त राहू शकते, असा अंदाज आहे. रॉयटर्स पोलने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रिझर्व्ह बँकेने महागाईचा दर 4 टक्क्यांपेक्षा कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. नोव्हेंबर महिन्यात महागाई 4.62 टक्क्यांवरून 5.54 टक्के झाली होती. गेल्या 3 वर्षांतला हा महागाईचा उच्चांक होता.

मंदीची झळ तीव्र

CNBC TV18 ने दिलेल्या वृत्तानुसार 3 ते 8 जानेवारी केलेल्या रॉयटर्स पोलमध्ये सुमारे 50 अर्थतज्ज्ञांनी, डिसेंबरमध्ये भारतात महागाईचा दर 6.20 होईल, असा अंदाज वर्तवला होता.गेल्या महिन्यात कांद्याच्या किंमतींमध्ये जोरदार तेजी आली होती. कांद्याच्या किंमती 10 पटीने वाढल्या. यामुळे मार्चपासूनच खाद्यपदार्थांची महागाई वाढली. मागणी कमी झाल्याने पुरवठा कमी झाला. त्यामुळे आर्थिक मंदीची झळ आणखी तीव्र झाली आहे.

अशी वाढली महागाई

जून महिन्यात महागाईचा दर 3.18 टक्के होता.

जुलै महिन्यात महागाईचा दर 3.15 टक्के झाला.

ऑगस्ट महिन्यात महागाई 3.28 टक्के होती.

(हेही वाचा : प्रत्येक कामासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, ATMवर मिळणार या 10 सेवा फ्री)

महागाईचा चढता दर

सप्टेंबरमध्ये हाच महागाईचा दर 3.99 टक्के झाला.

ऑक्टोबर महिन्यात ही महागाई वाढून 4.62 टक्के झाली.

नोव्हेंबरमध्ये हीच महागाई 5. 54 टक्के झाली.

गेल्या डिसेंबर महिन्यातला महागाईचा दर तर आणखी वर गेल्याचा अंदाज आहे. ही सगळी आकडेवारी पाहता या वर्षात महागाईचा वाढता दर रोखण्याचं आव्हान मोदी सरकारसमोर आहे. 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होतोय. त्या पार्श्वभूमीवर आर्थिक मंदी रोखण्यासाठी सरकारला मोठ्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

==============================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: January 13, 2020, 4:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading