Home /News /money /

कोरोना काळात महागाईनं मध्यमवर्गाचं कंबरडं मोडलं; तेल, किराणाच्या किमती 50 टक्क्यांनी वाढल्या

कोरोना काळात महागाईनं मध्यमवर्गाचं कंबरडं मोडलं; तेल, किराणाच्या किमती 50 टक्क्यांनी वाढल्या

गेल्या वर्षी 135 रुपये प्रतिलिटर दराने विकलं जाणारं खाद्यतेल आता तब्बल 185 रुपयांपर्यंत पोहोचलं. 81 रुपयांची तूरडाळ 107 रुपयांवर, अगदी साबणसुद्धा 40 टक्क्यांनी महागला आहे. पेट्रोल-डिझेलबरोबर किराणानेही झटका दिला आहे.

नवी दिल्ली, 11 जून: कोरोनाच्या (Coronavirus pandemic) पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (lockdown) आधीच अनेक नागरिकांच्या हातातील कामं गेली आहेत. त्यामुळे कित्येक जणांना घर चालवणं अवघड झालेलं असतानाच, आता महागाईनेही तोंड वर काढलं आहे. एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या (fuel prices) किंमती आभाळाला भिडलेल्या असतानाच, रोजच्या किराणा सामानाच्या grocery price hike) किंमतींमध्येही गेल्या वर्षात 40 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. तसेच, खाद्यतेलाच्या किंमतीही तब्बल 50 टक्क्यांनी वाढल्या आहेत. आता तेलासह किराणा सामानांच्या किंमतीतही वाढ झाल्याने घर कसे चालवायचे, हा मोठा प्रश्न सामान्यांपुढे उभा ठाकला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कशा वाढल्या किंमती पाहा गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या किमतीचं वृत्त आज तकने दिलं आहे. फॉर्च्यून कंपनीचे मोहरीचे तेल हे गेल्या वर्षी 135 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात होते. यावर्षी मात्र त्याची किंमत तब्बल 185 रुपये प्रतिलिटर आहे. रुची गोल्ड कंपनीच्या खाद्यतेलाची किंमत गेल्या वर्षी 129 रुपये प्रतिलिटर होती. तेच आज 170 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. ही केवळ दोन उदाहरणे झाली. या महिन्यात आहे LPG गॅस सिलेंडर स्वस्तात खरेदी करण्याची संधी, पूर्ण करा हे काम रोजच्या वापरातील सामान म्हणजेच फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (FMGC) बाबत बोलायचं झाल्यास, गेल्या एका वर्षांत यांची किंमत तब्बल 20 टक्क्यांनी वाढली आहे. डाळ-भातही झाला महाग डाळ, भात, साखर अशा अत्यावश्यक गोष्टींच्या किंमतीही आश्चर्यकारकरित्या वाढल्या आहेत. गेल्या वर्षी 81 रुपये प्रतिकिलो दराने विकली जाणारी तूरडाळ आज 107 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. इतर गोष्टी तर दूरच, साध्या चहा पावडरची किंमतही या वर्षात 15 ते 20 टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे. DA मिळाल्यानंतर तुमच्या पगारावर कसा होणार फिटमेंट फॅक्टरचा परिणाम, वाचा सविस्तर शॉप एक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमित शर्मा यांनी सांगितले, की तांदळाची किंमत एका वर्षात 7 टक्क्यांनी वाढली आहे. तसेच साखर 5 टक्क्यांनी, साबण 15 टक्क्यांनी, डिटर्जंट पावडर 10 टक्क्यांनी, फ्लोअर क्लीनर 5 टक्क्यांनी महागले आहेत. सर्वात वाईट परिणाम खाद्यतेलांवर झाला आहे, असेही ते म्हणाले. साबण-डिटर्जंट महागले लाईफबॉय साबणाची 125 ग्रॅमची वडी गेल्या वर्षी 22 रुपयांना मिळत होती, ती आता 27 रुपयांना मिळत आहे. तसेच, डव साबणांची किंमतही 123 वरुन 142 रुपयांवर पोहोचली आहे. तसेच, सर्फ एक्सलचे एक किलोचे पाकिटही 120 वरुन 128 रुपयांवर पोहोचले आहे. ज्यांच्या किंमती स्थिर, त्यांचं माप झालं कमी कित्येक कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किंमती स्थिर ठेवल्या आहेत. मात्र या बदल्यात त्यांनी सामानाचे वजन म्हणजेच क्वांटिटी कमी केल्याचे दिसून येत आहे. उदाहरणदाखल बोलायचे झाल्यास, मॅगी नूडल्सची किंमत जैसे थे आहे. मात्र, एका पाकिटाचे वजन 70 ग्रॅमवरुन कमी करुन 60 ग्रॅम करण्यात आले आहे.
First published:

Tags: Coronavirus, Economy, Inflation, Pandemic

पुढील बातम्या