मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SBI आणि PNB खातेधारकांनी हे नंबर सेव्ह करा, अनेक सुविधांचा लाभ घरबसल्या मिळेल

SBI आणि PNB खातेधारकांनी हे नंबर सेव्ह करा, अनेक सुविधांचा लाभ घरबसल्या मिळेल

टोल फ्री क्रमांकांद्वारे कोणत्या बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकता. जेणेकरुन यानंतर तुम्हाला कोणत्याही गरजेमध्ये अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

टोल फ्री क्रमांकांद्वारे कोणत्या बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकता. जेणेकरुन यानंतर तुम्हाला कोणत्याही गरजेमध्ये अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

टोल फ्री क्रमांकांद्वारे कोणत्या बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकता. जेणेकरुन यानंतर तुम्हाला कोणत्याही गरजेमध्ये अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 14 सप्टेंबर : डिजिटलायझेशनमुळे लोक आता बँकिंग सेवांसाठी नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग इत्यादींचा अधिक वापर करत आहेत. देशातील दोन सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक या दोन्ही बँकांनी त्यांच्या ग्राहकांना YONO अॅप, PNB One सारख्या मोबाईल अॅप्सची सुविधा दिली आहे. याशिवाय या बँकांनी ग्राहकांना टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक देखील जारी केला आहे. ज्याद्वारे तुम्ही बँकेशी संबंधित अनेक सेवांचा लाभ घेऊ शकता.

अनेक वेळा बँकेचे एटीएम कार्ड हरवले किंवा खात्यातील अर्जंट बॅलन्स तपासावे लागतात. अशा परिस्थितीत आपण हे नंबर आपल्या मोबाईलमध्ये ठेवणे गरजेचे आहे. यानंतर तुम्हाला कोणत्याही गरजेमध्ये अडचणीचा सामना करावा लागणार नाही. यासह या टोल फ्री क्रमांकांद्वारे कोणत्या बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकता.

पीएनबी ग्राहकांसाठी टोल फ्री नंबर

पीएनबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. बँकेने सांगितले आहे की जर तुमचे एटीएम कार्ड कुठेतरी हरवले असेल आणि तुम्हाला कार्ड ब्लॉक करायचे असेल तर तुम्ही 1800 103 2222, 1800 180 2222, 0120 249 0000 या तीन नंबरवर कॉल करू शकता. हा बँकेने जारी केलेला टोल फ्री क्रमांक आहे. त्यावर कॉल केल्यास तुम्हाला अनेक प्रकारच्या सेवेचा लाभ मिळेल.

पीएनबी ग्राहकांना टोल फ्री क्रमांकाकर कोणत्या सुविधा मिळणार

>> बॅलेंस चेक करणे

>> मिनी स्टेटमेंट

>> चेक स्टॉप

>> एटीएम कार्ड ब्लॉक

>> एटीएम पिन जनरेट करणे, बदलने

>> नवीन डेबिट कार्ड रिक्वेस्ट

>> अकाउंट फ्रीज करणे

>> नवीन चेक बुक मागवणे आणि चेक बुक डिस्पॅच स्टेटस चेक करणे

>> डेबिट कार्ड स्टेटस चेक करणे

>>IFSC कोडची माहिती मिळवणे

SBI ग्राहकांसाठी टोल फ्री नंबर

तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल, तर तुम्ही बँकेने जारी केलेले टोल फ्री क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह केले पाहिजेत. या नंबरवर कॉल किंवा एसएमएस करून तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. हा टोल फ्री क्रमांक 1800 1234, 1800 2100, 1800 11 2211, 1800 425 3800, 080-26599990 आहे. या क्रमांकांवर कॉल केल्यास तुम्हाला अनेक प्रकारच्या सेवेचा लाभ मिळतो. या सेवा आहेत-

कोणत्या सुविधा मिळतील?

>> डेबिट कार्ड ट्रांजेक्शन लिमिट चेक करणे किंवा अपडेट करणे

>> ई-स्टेटमेंट मिळवणे

>> अकाउंट फ्रीज करणे

>> चेक पेमेंट थांबवणे

>> ग्रीन पिन जनरेट करणे किंवा अपडेट करणे

>> बॅलेंस चौकशी आणि शेवटचे 5 ट्रान्जॅक्शन चेक करणे

>> डेबिट कार्ड ब्लॉक करणे किंवा इश्यू रिक्वेस्ट पाठवणे

>> चेक बुक रिक्वेस्टचं स्टेटस तपासणे

First published:

Tags: Bank services, Pnb bank, SBI